अखेर ‘दादूस’ म्हणजेच विनायक माळी याच्या आयुष्यात झाली तिची एंट्री…

0
354
vinayak mali

आगरी- कोळी भाषेतून आपल्या सर्वाँना हसवणारा आपला लाडका दादूस, म्हणजेच विनायक माळी सध्या जोमात आहे. आरं थांब….. आरं ऐक असं म्हणत काही वर्षांपूर्वी एक तरुण सोशल मीडियावर गाजला तोच हा विनायक माळी. बघता बघता त्याने युट्यूब जगताममध्ये त्याचं नाव केलं. वेगळी ओळख तयार केली. दादूस, या नावानं तो कमालीचा प्रसिद्ध झाला.

iam_vinayakmali
विनायक माळीचा दादूस होत असतानाच आगरी भाषा आणि समाजही तितकाच लोकप्रिय झाला.
एक आगरी तरुण आणि त्याच्यासोबत घडणारे काही विनोदी किस्से विनायक माळीने ज्या अंदाजाच प्रेक्षकांसमोर आणले व ते किस्से काही वेळेतच लोकप्रिय झाले.

असा हा सर्वांनाच खळखळून हसवणारा विनायक आयुष्यातील अशा एका टप्प्यावर आला आहे जिथं त्याला ती भेटली आहे. बऱ्याच वेळेपासून तो तिची वाट पाहत
होता. मात्र खुद्द विनायकनंच त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन याची माहिती दिली. त्याच्या आयुष्यात आलेली ती म्हणजे विनायकची नवीकोरी कार.

विनायक माळी यानं नुकतीच मर्सिडीज बेन्झ सी क्लास ही कार खरेदी केली. त्यांनी या संबंधीची रील देखील टाकली आहे. त्याने आपल्या कारची पहिली झलक सुद्धा त्याच्या चाहत्यांना दाखवली आहे. स्वत:च्या कमाईतून ही कार त्यानं खरेदी केली आहे. तो खूप जास्त खुश असल्याचं देखील दिसून येत आहे.

Leave a Reply