“२.३० तासाच्या चित्रपटातून..” प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

0
346
From the 2.30 hour movie Prajakta Mali's post went viral on social media

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खूप चर्चेत आहे.‘रानबाजार’ या तिच्या वेबसीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे तिच्या बाबत समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. छोट्या पडद्यापासून प्राजक्ताने आपल्या करिअरला सुरुवात करत कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या आजी-आजोबांसह एक फोटो पोस्ट केला आहे.

काय आहे पोस्टमध्ये?
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोत ती तिच्या आजी- आजोबा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेल्याचे दिसत आहे. या फोटोसबत तिने कॅप्शन दिले आहे. “एक दिवस आजी-आजोबांसोबत.. आणि आम्ही ‘सरसेनापती हंबीरराव’ पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट. प्रविण दादा तू भारी आहेस, विषय कट. २.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला.. आणि त्याने आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम महेश लिमये नेहमीप्रमाणे कडक कामगिरी. गश्मिर महाजनी आणि श्रुती मराठे मोहिम यशस्वी. प्रत्येक मराठी माणसानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. (मी पुन्हा किमान दोनदा तरी पाहणार आहे..) आजी- आजोबा एकदम खूश…”.

 

prajakta-mali-sarsenapati-hambirrao-pravin-tarde
सोबतच प्राजक्ताने अभिनेता प्रवीण तरडेंसोबतचा महाराष्ट्राची हास्यजत्रेतला फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान प्राजक्ताने प्रवीण तरडे आणि ‘सरसेनापती हंबीरराव’च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

Leave a Reply