‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचा पहिला टिझर रिलीज झाल्यापासूनच लोकांच्या मनात चित्रपटाविषयी आणि आलिया भट्टच्या अभिनयाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. यात अजय देवगणचा कॅमियोदेखील आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून गंगुबाईंच्या कुटुंबियांना धक्का बसला असून चित्रपटात गंगुबाईंसारख्या इतकं मोठं सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला वेश्या म्हणून दाखवल. त्यांची बदनामी केली गेलीये असा दावा गंगुबाई च्या कुटुंबीयांनी केलाय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेली अनेक दृश्य ही चुकीच्या पध्दतीने चित्रित केली असल्याचे आरोप गंगुबाईंचे नातू विकास गौडा यांनी केले आहेत.
हा चित्रपट बनवताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी आम्हाला विचारलेलं देखील नाही असा आरोप गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी केला आहे. वेळ पडलीच तर आम्ही न्यायालयात देखील जाऊ अशी भूमिका गंगुबाईंच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. ‘हुसैन झैदी’ या लेखकाच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली जावी असं गंगुबाईंच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.आम्ही सगळे पुरावे सादर केल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात अजूनही हे प्रकरण खोळंबलेलं आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आधी यासंदर्भात सुनावणी होईल अशी आम्ही आशा करतोय.”
गंगुबाईंच्या कुटुंबियांचे वकील वकील नरेंद्र दुबे म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून गंगुबाईंच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. ते म्हणाले की ज्या प्रकारे गंगुबाईंना दाखवण्यात आलंय ते अत्यंत चुकीचं आणि अश्लील आहे. त्यांना व्हॅम्प आणि लेडी डॉन बनवण्यात आलं आहे.कुटुंबीयांच्या मते जेव्हापासून गंगुबाईंवर चित्रपट येतोय हे त्यांच्या नातेवाईकांना कळलंय तेव्हापासून त्यांना नातेवाईकांच्या वेड्यावाकड्या प्रश्नांना, टोमण्यांना सामोरं जावं लागतंय. त्यांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय.” गंगुबाईंनी बाबुराव, बेबी, शकुंतला आणि राजन अशी चार मुलं दत्तक घेतली होती.