KGF2 च्या ‘तुफान’ चित्रपटाच्या गाण्याचा धमाकेदार व्हिडिओ पाहिलात का?

0
385
KGF2 Tufan song

दाक्षिणात्य चित्रपट एकामागोमाग पडद्यावर आदळत आहेत. त्यात हे चित्रपट इतके दमदार असतात की, कोणताही चित्रपट असुदद्यात सर्वाँना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली असते. त्यात बहुप्रतिक्षित कन्नड सुपरस्टार यशचा आगामी चित्रपट KGF 2 चे चाहत्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा धमाकेदार व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये यशची सुपर स्टाईल पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

सुपरस्टार यशचा सुपरहिट चित्रपट KGF, केजीएफ २ च्या सिक्वेलची अनेक दिवसांपासून चर्चा होतेय. आता हा चित्रपट अखेर १४ एप्रिल २०२२ रोजी रिलीज होणार असून, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘तुफान’ या पहिल्या धमाकेदार गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला आहे. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.KGF2 Tufan song Rocky Bhai

यश आणि श्रीनिधी शेट्टीच्या या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. चित्रपटातील या गाण्यात रॉकी या पात्राचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोमात पसंती मिळताना दिसत आहे.

Tufan song

Leave a Reply