‘माझा होशील ना’ विराजस कुलकर्णी – शिवानी रांगोळेचे नवे फोटो शुट पाहिलेत का?

0
438
Have you seen the new photo shoot of Virajas Kulkarni-Shivani Rangole

माझा होशील ना’ या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्बत केलयं. शिवानी आणि विराजसने अनेक नाटकांत सोबत काम केलयं. विराजने डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यानं केले आहे.गेल्या कित्येक काळापासून विराजस अभिनेत्री शिवानी रांगोळेला डेट करत असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. अलिकडेच या दोघांचा साखरपुडादेखील पार पडला.

Virajas Kulkarni-Shivani Rangole

हे दोघही आता लवकरच लग्नगाठ बांधून त्यांच्या प्रेमाची गाठ आणखी घट्ट करणार आहेत. ‘व्हॅलेंनटाईन डे’ च्या निमित्तानं विराजस कडून जाणून घेऊया विराजसने शिवानीला ‘माझी होशील ना’ कसं विचारलं.विराजस आणि शिवानी यांनी व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत एक छान फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटपैकी काही फोटो त्यांना इन्स्टाग्रामवर शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकताच त्यांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली आहे.ही जोडी गेल्या कित्येक काळापासून एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे
विराजस फक्त अभिनेता नसून तो दिग्दर्शकदेखील आहे. विशेष बाब म्हणजे विराजस प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. तर शिवानीने बऱ्याच मराठी मालिका आणि सिनेमात काम केले आहे. अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी यांनी’अवंतिका’, ‘सोनपरी’ अशा कितीतरी हिंदी-मराठी गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

Leave a Reply