संजय राऊत यांनी दिले संकेत; शिवसेना आता कायदेशीर लढाई लढाण्यास तयार.

0
346
Hints given by Sanjay Raut Shiv Sena is now ready to fight a legal battle

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकावण्यात आले आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जी भाषा वापरली आहे ती आम्हाला मान्य नाही, असे मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना आता बंडखोर गटाविरोधात कायदेशीर लढाई लढायला तयार आहे, असेही ते म्हणाले.

सरकार वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या शरद पवार यांना घरी जाऊ दिले जाणार नाही, असे केंद्रीय मंत्र्याने ट्विटद्वारे धमकी देण्यात आली आहे. शरद पवारांबद्दल अशी भाषा वापरणे अत्यंत चूकच आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, आता लोक धमक्या देतायत. शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माजल गेली आहे. ह्या धमक्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना यांचा पाठिंबा आहे का? आम्ही बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची कारवाई करत आहोत. अस देखील संजय राऊत म्हटले.

शिवसेना कायद्याची लढाई लढायला तयार आहे. कागदाची, कायद्याची आणि रस्त्यावरची लढाई शिवसेनाच जिंकणार, असं संजय राऊत यांनी म्हटले. बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या निष्ठेची निषक लागेल असं संजय राऊत यांनी सुनावलं. राज्यात केंद्रीय मंत्री पवारांना धमक्या देतो आहे. हे मोदी शाहांना मान्य आहे का असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

राणेंनी काय केलेय ट्विट
नारायण राणे ट्विटद्वारे म्हटले, आमदारांच्या केसाला तरी धक्का लागल्यास तर घर गाठणं कठीण होईल असं राणे म्हणत. शरद पवारांना धमकी दिली आहे. सभागृहात येऊन दाखवा, शरद पवार सर्वांना धमक्या देत आहेत’ ते येणारच आहेत. ते येणार आणि मनाप्रमाणे मतदान करणार आहेत.
महाराष्ट्रात सध्या राजकीय उलाढाल सुरु आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जवळपास १२ अपक्ष आणि लहान पक्षांव्यतिरिक्त ४० हून जास्त आमदारांचा पाठिंबा आहे असा दावा केला. गुवाहाटी येथून पत्रकाराशी बोलताना शिंदे यांनी शरद पवारानं वर टीका केली की, आम्ही धमक्यांना घाबरत नाही. आम्ही जे काही करत आहोत ते पूर्ण कायदेशीर पणे करत आहोत. आमच्याकडे बहुमत असून सर्व आमदारांनी स्वतःहून सहभागी झाल्याची शपथपत्रे दिली आहेत.

Leave a Reply