हृतिक रोशन या अभिनेत्रीला करतोय डेट… हातात हात घालून दिसले एकत्र ?

0
431
Hrithik Roshan is dating actress ... hand in hand

बॉलीवूड मधील सर्वात हॉटेस्ट अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. हृतिक रोशन त्याच्या अभिनयातून तर कधी त्याच्या डान्स मधून सर्व चाहत्यांना घायाळ करतो. नुकतंच अभिनेता हृतिक रोशन बॉलीवूड अभिनेत्री सोबत दिसला . सध्या त्या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

hrithik roshan

शुक्रवारी रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंट बाहेर पडताना पापाराझींनी त्याचा हा व्हिडीओ काढला. यावेळी हृतिकसोबत असलेल्या एका तरुणीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या तरुणीचा हात पकडून हृतिक रोशन रेस्टॉरंटबाहेर निघाला होता. मात्र ती व्यक्ती आहेत तरी कोण याबाबत अजूनही नेटकऱ्यांमध्ये शंका सुरु आहे. ती कोण आहे आणि हृतिकने तिचा हात का धरला, असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारले आहेत. अद्यापही दोघांबद्दलची खरी काय ती माहिती समोर आलेली नाही आहे.

हृतिकसोबत असलेली ती तरुणी ही सबा आझाद (Saba Azad) असल्याचं म्हटलं जात आहे. सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत आहेत का, असाही अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुझसे फ्रँडशीप करोगे’ या चित्रपटात सबाने मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी ती नेटफ्लिक्सच्या ‘फिल्स लाइक इश्क’ या वेब शोमध्येही झळकली होती. सबा लवकरच ‘रॉकेट बॉईज’ या सोनी लिव्हच्या सीरिजमध्येही दिसणार आहे.

sab azadhrithik roshan datiing girl

Leave a Reply