असं होतं तर मग! कुशल बद्रिकेने सांगितली आपल्या पत्नीची व्याकूळ कहाणी

0
392
If that happened then! Kushal Badrike tells his wife's disturbing story

कुशल बद्रिके हा विनोदवीर आपल्या कलाकृती मुळे खूप यशस्वी झाला. विनोदाचे अचूक टायमिंग आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या यशाचा हा वाटा तो पत्नी सूनयनाला देखील देताना दिसतो. अनेकदा आपल्या अडचणीच्या काळात पत्नीने मोलाची साथ दिली असल्याचे तो आवर्जून सांगतो.

Kushal-Badrike-with-Wife

मात्र त्याच्या या खडतर प्रवासात आणि घर संसारात रमताना पत्नीचे कथक नृत्यालयात शिकण्याचे स्वप्न मात्र अपुरेच राहिलेले पाहायला मिळाले. संसाराची जबादारी सांभाळत असताना तिचा हा त्याग खूप मोठा आहे असं कुशल भावनिक होऊन म्हणताना दिसतो.

त्याने असेही म्हंटले की, सूनयनाला दिल्लीला जाऊन कथक शिकायचे होते, मात्र तिची ही ईच्छा पूर्ण होऊ शकली नाही. परंतु तू त्याच मंचावर आज परफॉर्मन्स सादर करतेस ही माझ्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आयुष्यातली सगळी स्वप्नं आकार घेर नाहीत, पण त्यातली काही साकार होतात हे खरं. ही संधी तुला देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आणि एकच गोष्ट सांगेन, जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी अशी एक पत्नीला उद्देशून कुशलने सोशल मीडियावर भावनिक मेसेज शेअर केला आहे.

Kushal-Badrike-with-Wife-Anubhava-

कुशल बद्रिके हा चाळीत राहणारा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा. अंबरनाथ येथील कॉलेजमध्ये तो शिकायला होता. त्यावेळी एका एकांकिकेच्या नाटका दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि काही वर्षानंतर ते विवाहबंधनात अडकले.

Kushal-Badrike

Leave a Reply