‘चला हवा येऊ द्या’ मध्ये दिसणार ‘या’ अभिनेत्याचा मराठमोळा अंदाज

0
393
akshay kumar kriti sanon in chala hawa yeu dya

बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आणि बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतीच झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली. दोघेही त्यांच्या आगामी चित्रपट ‘ बच्चन पांडे ‘ च्या प्रमोशन साठी या कार्यक्रमात उपस्थित राहिले. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. लवकरच तो ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

news

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमाचा प्रत्येक भाग लोकांना हसवल्याशिवाय पूर्ण होत नाही. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे कि मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली.

akshaykumar movie

पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील. खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की टाळ्या आणि शिट्या थांबल्याच नाहीत. चला हवा येऊ द्या च्या मंचावर अक्षय कुमार यांचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Leave a Reply