“मुलगी झाली हो” या मालिकेतील मुलीनेच केले बापावर गंभीर आरोप

0
417
In the series Mulgi Jhali Ho The daughter made serious allegations against the father

 

“मुलगी झाली हो” या मालिकेतील मुलीनेच केले बापावर गंभीर आरोप

मुलगी झाली हो’ या मालिकेतील किरण माने हा वाद आता सर्व परिचित झाला आहे. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. या मालिकेत ‘माऊ’च्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत साजिरी पाटील म्हणजेच ‘माऊ’ची भूमिका वठविणाऱ्या दिव्या पुगांवकर हिने देखील याप्रकरणी तिचे मत व्यक्त केले आहे. “किरण माने आणि माझे बोलणंच व्हायचे नाही. जेव्हा मी सुरुवातीला या मालिकेच्या सेटवर आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मी तुझ्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आपण सेटवरही असेच राहूया. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते, असे ती म्हणाली.यानंतर मालिकेतील काही कलाकारांनी किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

दिव्या पुगावकरनेदेखील किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. दिव्या म्हणाली, “किरण मानेंनी सेटवर अपशब्द वापरले. मला सारखे टोमणे मारले”.”त्यानंतर मला ते विविध गोष्टींवर टोमणे मारायचे. माझ्या वजनावरुन ते मला बोलायचे. मात्र आम्ही बाप-लेक म्हणूनच सेटवर बरीच थट्टा मस्करी करत असतो. ते मला मुलगी मानतात, मग मला सांगा कोणता बाप आपल्या लेकीसाठी अपशब्द वापरतील, असे स्पष्टीकरणही दिले आहे.

Leave a Reply