तुझ्यात जीव रंगला मालिकेतील युवराज झळकतोय या मालिकेत…

0
490
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील युवराज झळकतोय या मालिकेत
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील युवराज झळकतोय या मालिकेत…

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत बालकलाकाराचे नाव प्रेक्षकांच्या तोंडावर येत होते ते म्हणजे नंदिता वहिनींचा मुलाचे तो म्हणजे ‘युवराज’ या मालिकेतील नकारात्मक भूमिका केलेले नंदिता हे पात्र बरेच गाजलं तिच्या सारख्या स्वभावाचा दाखवलेला हा युवराज नेमका कोणाचा मुलगाआहे असा प्रश्न अनेकांना पडला होता तर हा बालकलाकार मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे ज्याने अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

yuraaj as shreyash mohite

युवराज म्हणजेच श्रेयसच्या ख-या खु-या आयुष्यातील वडिलांचे नाव आहे संजय मोहिते . संजय मोहिते यांना तुम्ही अनेक चित्रपट, नाटकांतून पाहिले असेल. सोंगी भजन, हौशी नाटक, राज्यनाट्य स्पर्धां, ऑर्केस्ट्रामधून संजयने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कोल्हापूर मधून “सोकाजीराव टांगमोरे” या नाटकाची निर्मिती केली. त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. ‘फॉरेनची पाटलीन, वन रूम किचन, कर्तबगार, ऑन ड्युटी चोवीस तास, नातवंड यांसारख्या ब-याच मराठी चित्रपटांत त्याने काम केले आहे.

श्रेयस मोहिते आता सन मराठी वाहिनीवरील “आभाळाची माया” या मालिकेत दिसत आहे. या मालिकेतील त्याचे नाव बंटी आहे. आभाळाची माया या मालिकेत अशोक फळदेसाई आणि अपूर्वा सपकाळ मुख्य भूमिकेत दीसत आहेत तसेच याच मालिकेत श्रेयसचे वडील म्हणजेच अभिनेते संजय मोहिते हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेमुळे खऱ्या आयुष्यातील बाप लेक एकत्रित प्रेक्षकांसमोर आले आहेत.

aabhalachi maaya sun marathi

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचा मुलगा श्रेयस मोहिते सुद्धा कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. श्रेयसने ‘फिनिक्स ऍक्टिंग स्कुल’ मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. तुझ्यात जीव रंगला ही त्याची अभिनित केलेली पहिलीच मालिका आहे.

Leave a Reply