अखेर भारतीयाने काढले रशियाविरुद्ध हत्यार, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

0
411
Indian finally removes weapon against Russia, video goes viral on social media

रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध दिवसेंदिवस अधिकच वाढत जात आहे. तेथील हल्ल्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता एक नवीन चकीत करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका भारतीय तरुणाचा युक्रेनच्या सैन्यात प्रवेश आणि त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.

 

आज दोन आठवडे झाले तरी रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्धाला सुरूच आहे. आहेत. एकमेकांवर बॉम्बहल्ले करत एकमेकांविरोध युद्ध सुरू आहे. येथील नागरिक मात्र हैराण झाले आहेत. युक्रेन छोटा देश असूनही रशियासमोर न झुकता विरोध करत आहे. युक्रेनने आपले सैन्यही वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विविध देशांतून काही तरूण युक्रेनच्या सैन्यात सामील झाले आहेत.R Sainikhesh

तर यातच दुसरीकडे रशियावरील निर्बंध जगभरात वाढत आहेत. मात्र आता नुकताच एक या विषयीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. एका भारतीय तरुणाचा युक्रेनच्या सैन्यात प्रवेश आणि त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. यूझर्सकडून या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

R-Sainikhesh pick up gun ukraine

या व्हिडिओतून युक्रेनने रशियासमोर शरणागती पत्करलेली नाही, असे व्हिडिओत सांगितले जात आहे. त्याचबरोबर युक्रेनच्या सैन्याविषयी यात माहिती आहे. एक भारतीय युवा सैनिकेश रविचंद्रन हा युक्रेनच्या सैन्यात सामील होऊन रशियाशी लढत आहे. त्याने भारतीय सैन्यासाठी प्रयत्न केले होतो, मात्र त्यात त्याला अपयश आले. आता हाच सैनिकेश मानवतेच्या लढाईत युक्रेनसोबत रशियाची दोन हात करत आहे.

यूट्यूबवर एटू मोटिव्हेशन अरविंद अरोरा या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. माहितीपूर्ण अशा या व्हिडिओला व्ह्यूजही चांगले मिळत असून काही तासांतच या व्हिडिओला 1.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Leave a Reply