फोनमधून कमी आवाज येतोय का?, सेवा केंद्रकडे धाव घेण्याची गरज नाही, घरीच करू शकतात फोन ठीक

0
331
Is there less noise coming from the phone No need to rush to the service center, you can make the phone at home.

नवनवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला नवीन फोन चांगला चालतो. परंतु, काही कालावधी नंतर फोनमधील एक एक करून समस्या बाहेर येतात. काही स्मार्टफोनमध्ये आवाज कमी होत जातो. काहीना कॉल चालू असताना आवाज कमी येत याचा त्रास होतो. त्यामुळे जास्तीत जास्त स्मार्टफोन वापर कर्ता सेवा केंद्रकडे धाव घेत असताना दिसतात. ही समस्या स्पीकर्स मध्ये धुळीचे कण गेल्याने होते. या समस्येचे प्रतिबंध करण्यासाठी तुम्हाला सेवा केंद्रला जाण्याची गरज नाही. तुम्ही या समस्येला घरी ठीक करू शकता. आज आम्ही तुम्हाला फोनच्या स्पीकरला कोणतेही नुकसान होणार नाही, या संर्दभात काही टिपा सांगत आहोत.

Is there less noise coming from the phone you can make the phone at home.

व्यावसायिक स्वच्छता किट….

या पद्धतीमध्ये तुम्हाला थोडेफार पैसे खर्च करावे लागणार आहेत. तुमचा फोन सुखरुपपणे स्वच्छ होईल. तुम्ही आफ्टर मार्केट किंवा ऑनलाइन वेबसाइटवरून एक स्मार्टफोन स्वच्छता किट खरेदी करू शकता. याच्या साह्याने स्पीकरला स्वच्छ करू शकता.

मऊ ब्रशचा वापर करावा…..

स्वच्छता किटसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही घरातील कोणत्याही ब्रशचा वापर करू शकता. मात्र, हा ब्रश मऊ आणि स्वच्छ सुद्धा असायला हवा. मऊ ब्रशच्या साह्याने तुम्ही याला हळूवार पणे स्वच्छ करू शकता.

संकुचित हवा पंप…

एक संकुचित हवा पंप साह्याने तुम्ही फक्त फोनच नाही तर फोनचा स्पीकर ग्रील आणि तसेच चार्जिंग पोर्टलाही सुद्धा स्वच्छ करू शकता. फक्त हे करताना हा संकुचित हवा पंप अधिक पॉवरफुल तर नाही ना याची खात्री करून घ्या.

घरगुती कपड्याचा वापर करावे…

तुमच्याकडे वरती सांगितलेल्या पैकी कोणतेच सामान तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही घरातील स्वच्छ कपड्याचा वापर देखील नक्कीच करू शकता. या कपड्याच्या मदतीने तुम्ही फोनचे स्पीकर स्वच्छ करू शकता. फक्त हे करताना कपड्याचे कोणतेही तुकडे स्पीकर मध्ये जाणार नाही, याची खात्री करून घ्या.

Leave a Reply