जग्गूदादा, पोहचले पुण्यात! त्यांचं हे असं जाणं थोडं नवलच, काय आहे कारण?

0
302
Jaggudada, reached Pune! It's a little new for them to go like this, what is the reason

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॅाफ आपला जबराट स्टाईलमुळे आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. तसेच ते त्यांच्या घरात काम करणाऱ्या कामगारांनाही तितकाच जीव लावतात, जितका ते घरच्यांना लावतात. त्यांच्या या प्रेमाचं आणि दिलदार व्यक्तिमत्त्वाच उदाहरण अनेकदा आपल्याला पाहायला मिळालं आहे.
जॅकी श्रॉफ यांचं पुण्याच्या मावळमधील चांदखेड येथे फार्महाऊस आहे. नुकतेच जॅकी यांच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या नोकरांच्या वडिलांचे निधन झाले. ही बातमी कानावर पडताच, जॅकी त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी तेथे गेले.

Jaggudada01

त्यांचे तेथील हे फोटो पाहून चाहते त्यांचे भरभरून कौतुक व आदर व्यक्त करत आहेत. सागर दिलीप गायकवाड हा जॅकी श्रॉफ यांच्या चांदखेड येथील फार्म हाऊवर काम करतो. त्याचे वडील दिलीप गायकवाड यांचं नुकतंच एका आजाराने दुःखद निधन झालं. याची माहिती कळताच अभिनेते गायकवाड कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी चांदखेड येथील त्यांच्या घरी पोहचले.

Jaggudada02

जॅकी श्रॉफ ह्यांची ही बाजू पहिल्यांदाच दिसली नाही. ते बऱ्याचदा मावळच्या या फार्महाऊसवर अनेकदा ते मुंबईहून येत असतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जॅकी श्रॉफ इथे फिरायला येत असतात. पण इथे आल्यावर ते गावातील लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतात.

Leave a Reply