जयंत पाटीलानी एलोन मस्कला दिले ट्विटरवरुन आमंत्रण

0
475
Jayant Patil invites Elon Musk on Twitter

जगप्रसिद्ध ई-वाहन उत्पादन कंपनी टेस्लाला भारतात टेस्ला कार आणण्यासाठी शासकीय पातळीवर अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत एलॉन मस्क यांनी केली. अमेरिकेची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी ‘टेस्ला’ला हिंदुस्थान बाजारपेठेतील प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

एलॉन मस्क यांनी अलीकडेच हिंदुस्थानात टेस्ला लाँच करताना केंद्र सरकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. एलॉन मस्क यांनी त्यांना सध्या अशा स्थितीत उत्पादनाच्या लॉन्चिंगची वेळ सांगू शकत नाही, असे म्हटले होते. इलॉन मस्क यांच्या वक्तव्यानंतर काही तासांनी आता भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. भारतातील उत्पादनास वचनबद्ध केल्याशिवाय टेस्ला शुल्क कपातीची मागणी करू शकत नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यावर याआधी तेलंगणाचे उद्योग आणि अर्थमंत्री केटी रामाराव यांनी एलॉन मस्क यांना तिथे कंपनी सुरू करण्याचे निमंत्रण दिले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कंपनीचे मालक एलॉन मस्क यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतशील राज्यांपैकी एक आहे. इथे तुमची कंपनी स्थापन करण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ. आम्ही तुम्हाला तुमचा उत्पादन कारखाना स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतो, असे जयंत पाटील ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

टेस्ला हिंदुस्थानात येण्याआधी आयात शुल्कात त्यापाठोपाठ जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात कंपनी सुरू करण्याचे निमंत्रण टेस्ला कपात करण्याची मागणी करत आहे.तुम्ही टेस्ला कारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट महाराष्ट्रात उभारू शकता. महाराष्ट्रात युनीट उभारल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर आयात शुल्कात सवलत देण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. टेस्लाला आयात शुल्क लाभ दिल्यास हिंदुस्थानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या अन्य वाहन कंपन्यांना चांगला संदेश जाणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

Leave a Reply