“कच्चा बदाम” गायक भुबनने स्वतःच्याच गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ…

0
458
Kachha Badam singer Bhuban did a great dance to his own song, watch the video

इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये, भुबन बद्यकर त्याच्या स्वतःच्या गाण्यावर एका ग्रुप सोबत जबरदस्त डान्स केल्याचा व्हिडिओ जोरात व्हायरल होताना दिसत आहे

कच्चा बदाम गाण्याचे तर आज सर्व जण फॅन झाले आहेत, गल्ली कलाकार ते सिनेसृष्टीत या गाण्याचे वेड सर्वांना लावले आहे. आज प्रत्येकजण या गाण्यावर इंस्टाग्राम रील्स तयार करत आहे. सोबतच कच्चा बदाम हे गाणे आतापर्यंतचे सर्वात व्हायरल गाणे बनले आहे.

या गाण्यामागील आवाज, म्हणजेच या गाण्याचा गीतकार हा अगदी साधा आहे . हा गीतकार पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकणारा भुबन बद्यकर हा आहे. कोणीतरी याचा व्हिडिओ काढला व सोशल मीडियावर शेअर केला ,मात्र हा व्हिडिओ शेअर होताच या व्हिडिओतील गाण्याने इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. आता नुकताच अभिनेता नील भट्टाचार्यने अपलोड केलेल्या इन्स्टाग्राम रीलमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे.

kacha badam

इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये, भुबन बद्यकर एका ग्रुपसोबत या गाण्यावर नाचताना दिसत आहेत, सर्व प्रसिद्ध हुक स्टेप्स करत आहेत. असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “ज्या व्यक्तीने हे गाणे गायले आहे त्याच्यासोबत. आणि या गीतकरला साथ द्या… सोबतच त्याला भेटून आम्हाला आनंद झाला, असेही कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लोकांनी पहिला व सोबतच 1 लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

बऱ्याच इंस्टाग्राम युजर्सने यावर कमेंट केल्या असून, एकाने “बदाम अंकलसोबत डान्स, व्हा…तर दुसर्‍याने हार्ट इमोजीसह लिहिले, “तुम्ही सुंदर व निथळ हृदय असलेले व्यक्ती आहात.” व्हिडीओमध्ये गाण्यावर नाचताना दिसणारा अभिनेता दर्शन बनिक डे सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एकट्या भुबन बद्यकरसोबत नाचतानाची क्लिपही अपलोड केली आहे.

kachabadam

Leave a Reply