कपिलने शेअर केला मध्यरात्रीचा शाहरूख खानच्या घरचा मजेशीर किस्सा

0
289
Kapil shared a funny story about Shah Rukh Khan's house at midnight

अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माचा नेटफ्लिक्स स्पेशल ‘आय अॅम नॉट डन येट’ हा शो प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये त्याने त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफ विषयी खुलासा केला आहे. कपिलने बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा देखील एक किस्सा आपल्या शोमध्ये सांगितला. आमंत्रण नसताना कपिल शर्मा एकदा मद्यधुंद अवस्थेत मन्नतवर गेला होता.

Kapil sharma

कपिलने सांगितले, कपिलच्या चुलत बहिणीने शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु चुकीच्या वेळी मद्यपान करून शाहरुखच्या घरी गेलो. मी सॉरी भाई म्हणालो माझ्या चुलत बहिणीला तुझे घर बघायचे होते म्हणून मी गेट उघडे होते तर आत आलो.’ त्यावर शाहरुख हसत म्हणाला ‘माझ्या बेडरुमचा दरवाजा उघडा दिसला तर तू माझ्या बेडरुममध्ये पण जाणार का?’ असे मजेशीर अंदाजात म्हटले होते.

shah-rukh-khan

कपिलने चुलत बहीणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नशेत शाहरुखचा बंगला मन्नत पाहण्यासाठी तिला घेऊन गेला. कपिल आणि चुलत बहीण मन्नतवर पोहोचली तेव्हा तेथे पार्टी सुरु होती. बंगल्याचे दरवाजे उघडे होते. कपिलने ड्रायव्हरला कार बंगल्याच्या आतमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.

पुढे कपिल म्हणाला, सिक्युरिटी गार्डने माझा चेहरा पाहिला आणि मला ओळखले. त्याला असे वाटले की आम्हाला पार्टीचे आमंत्रण आहे. त्यामुळे त्याने आम्हाला जाऊ दिले’ असे कपिल म्हणाला. मद्यधुंद अवस्थेत घरात गेल्यावर मला थोडा विचित्र वाटला . आम्हाला आतमध्ये बोलावले. त्यावेळी रात्रीचे तिन वाजता तिथे गौरी तिच्या मैत्रीणींसोबत बसली होती. मी शाहरुख आतमध्ये होते मी आत गेलो तर शाहरुख डान्स करत होता. असा सर्व किस्सा कपिलने शोमध्ये सांगितला आहे.

Leave a Reply