‘केजीएफ-2’ अखेर प्रदर्शित झाला, हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित असून ज्या दरम्यान हा सिनेमा रिलीज झाला असून, लोकांनीं अक्षरशः ‘केजीएफ-2’ ला डोक्यावर घेतले आहे. ‘केजीएफ’ या चित्रपटाच्या भाग एकपासून या सिनेमाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यात साऊथ सिनेमांनी बॉलीवूड मध्ये नुसता धुमाकुळ घातला असताना, साऊथ सिनेमांचे क्रेझ अजूनच वाढले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, बॉलीवूड कलाकारांचीही हजेरी आता बॉलीवूड मध्ये लागली जातेय.

‘केजीएफ-2’ मध्ये अभिनेता यश याच्यासमवेत संजय दत्त आणि रविना टंडन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आणि आतापर्यंत या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रविनाच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. रविना टंडन चा चाहतावर्ग खूपच मोठा आहे, आता पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने ती सर्वांची मन जिंकत आहे.

अनेक वर्षे आपल्या पर्सनल लाईफ मध्ये गुंतलेल्या संसारात रविनाने पुन्हा एकदा दणक्यात पुनरागमन केले आहे. रविना फॅशनच्या बाबतीतही मागे नाही. रविना टंडन 47 वर्षाची आहे, आणि ती यंग आणि फॅशन दिवा क्विन आहे. सोशल मीडियावर ती तिचे स्टायलिश लूक्स बऱ्याचदा फ्लोंट करत असते. सध्या ती ‘केजीएफ-2’ च्या प्रमोशनमध्ये मग्न आहे.