कोरोनामुळे बॉलीवूडमधील अनेक महत्वाचे प्रोजेक्ट टांगणीवर होते. पण कोरोनाचे दुर्मिळ होत आलेले संकट बघता , बरेच बॅालिवूड चित्रपट एकामागोमाग एक कोसळत आहेत. त्यामध्ये बॉलीवूडच्या किंग खान शाहरुखचा ‘पठाण’ हा बहुचर्चित चित्रपट अडकून होता. आता सोशल मीडियावर त्याचा टीझर व्हायरल झाला असून या टिझरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज त्याचा टीझर प्रदर्शित झाला असून शाहरुखच्या चाहत्यांनी त्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.
25 जानेवारी 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आतापर्यत दोन वेळा या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. यश राजच्यी वतीने ‘पठाणची’ निर्मिती करण्यात आली आहे. बॉलीवूडची सध्याची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे.

चित्रपटाचा टीझर व्हायरल करताना शाहरुनं खास पोस्टही शेयर केली आहे. त्यानं लिहिलं आहे की, मला माहिती आहे जरा उशीरच झाला आहे. पण तारीख माझ्या लक्षात आहे. त्यामुळे मी काही चाहत्यांना निराश करणार नाही. 25 जानेवारी 2023 मध्ये माझा हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तो हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पठाण चित्रपटावर काम सुरु आहे. आता तो प्रदर्शनासाठी तयार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या टीझरमध्ये दीपिका आणि जॉन अब्राहम दिसत असून बॅकग्राउंडला शाहरुखचा आवाज आहे. चित्रपटामध्ये शाहरुख कोणत्या भूमिकेत असणार आहे याबाबत अजून कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. सर्वच प्रेक्षक वर्गाला आता हे जाणून घेण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.
Pathan Film Star Cast
