‘तुम्ही लग्न का केलं नाही?’ या प्रश्नावर लता मंगेशकरांनीच दिलेलं थेट उत्तर

0
373
Lata Mangeshkar direct answer to the question Why didnt you get married

कोकीळस्वर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी ६ फेब्रुवारीला रोजी निधन झाले. मुंबईत शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळेस त्यांनी सर्व चाहत्यांसाठी अखेरचा निरोप घेतला. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी, त्यांचा आवाज आजही कोट्यवधी रसिकांच्या मनात कायम राहणार आहे. लतादीदींनी सात दशकांच्या करिअरमध्ये त्यांचे स्वतःची ओळख निर्माण केली.

Lata Mangeshkar

काही वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला होता की, मी लग्न का केले नाही ? यावर लता दीदी म्हणाल्या होत्या, की, देवाच्या दयेने माझ्याकडे काम आहे. हे काम करताना मी खूप समाधानी असते. अर्थात तुम्हा सर्वांसारखे माझ्याही आयुष्यात दुःखाचे काही प्रसंग आले. परंतु हा त्रास क्षणिक असतो. लोकांना होणारा त्रास मला सहन होत नाही. त्यामुळे जसे जमेल तशी मी अडीअडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करते. त्यातूनही मला आनंद मिळतो, आणि यातच माझा समाधान देखील असतं.

लता मंगेशकर यांना जे जवळून ओळखायचे त्यांना दीदींचा मनमोकळा आणि प्रेमळ स्वभाव हा जाणून होता. आज त्या आपल्यात नाहीय पण त्यांचा आवाज व त्यांच्या आवाजातील ती गाणी आजही लोकांच्या ओठांवर येऊन वसली आहेत. ‘म्हणतात ना कलाकार कधीच मरत नाही, त्याच्या कलेसोबत तोही सोबत असतो’.या वाक्याला साजेस उदाहरण म्हणजे लता मंगेशकर.

Leave a Reply