ग्रामपंचायत निवडणुकीत पतीचा विजय…! पत्नीने जल्लोषात पतीला खांद्यावर उचलून  काढली गावभर मिरवणूक…!

0
669
Maharashtra Grampanchayat Nivadnuk wife carried her husband on her shoulders

संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागच्या आठवड्यात पार पडल्या.  15 जानेवारीला महाराष्ट्रभर मतदान पार पडले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल 17 जानेवारीला जाहीर करण्यात आला. उमेदवार निवडून आल्यावर कार्यकर्ते उमेदवाराला अंगा-खांद्यावर नाचवत मिरवणुक काढुन आनंदाचा जल्लोष साजरा करत असतात.

मात्र यंदाच्या निवडणुकीत, निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अगदी काही क्षणांमध्ये हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत येवून पोहोचला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या आपल्या पतीला पत्नीने खांद्यावर उचलून गावभर मिरवणूक काढली आहे, असा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

पुणे जिल्ह्यातील ‘पाळू’ या ग्रामपंचायतीकरता देखील या वर्षी 15 जानेवारीला  पंचवार्षिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. ‘जतमाता ग्रामविकास पॅनल’ ने अन्य पॅनलच्या सहा जागा राखून पराभव केला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ‘संतोष गुरव’ हे त्यांच्या पत्नी सोबत ‘जतमाता’ मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेले होते.

Palugav Khed Punde Husband Wife Grampanchayat Nivadnuk

जतमाता देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना आपल्या मित्राचा फोन आला व त्याने तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहात अशी बातमी दिली. बातमी दिल्यानंतर आपण विजयी झाल्याची बातमी संतोष यांनी आपली पत्नी रेणुका यांना सांगितल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला व जल्लोषात रेणुका यांनी आपले पती संतोष यांना खांद्यावर उचलून घेऊन गावातून मिरवणूक काढली.

हा आनंद सोहळा सर्व महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आहे. मीडिया च्या मुलाखतीमध्ये रेणुका यांनी सांगितले की, प्रत्येक महिलेने आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तसेच ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला पाठिंबा दिल्यास असे घवघवीत यश मिळते.

दरम्यान संतोष गुरव यांनी हा कुठलाही पब्लिसिटी स्टंट नसून त्यावेळी जो आनंद झाला त्याची ही केवळ एक प्रतिक्रिया होती, आपल्या पत्नीने आपल्याला उचलून गावात मिरवत मिरवत नेले हे समजायला देखील खूप वेळ लागला असे ते सांगतात. आनंदाच्या जोशात पत्नीने पतीला खांद्यावर उचलुन मिरवले यातून आपण महिला सशक्तिकरण व सक्षमीकरणाचा संदेश घेऊ शकतो.

आपल्या विरोधी उमेदवाराला पराजित करून संतोष गुरव हे यावर्षी ‘पाळू’ ग्रामपंचायतीवर सदस्य पदावर निवडून आले आहेत. एकंदरीतच उमेदवार निवडून आल्यावर त्याला बाकीचे कार्यकर्ते खांद्यावर घेऊन उचलून जल्लोष व्यक्त करत असतात मात्र पाळू गावातील संतोष गुरव यांच्या पत्नीने एक नवा आदर्श समाजापुढे उभा केला आहे व स्त्री- सशक्तीकरणाचा एक नवा मंत्रच त्यांनी जणू सर्व समाजातील स्त्रियांना दिला आहे.

Leave a Reply