छत्रपती शिवरायांच्या तडफदार सेनानीवर असणार महेश मांजरेकर यांचा ‘हा’ आगामी चित्रपट

0
399
Mahesh Manjrekar upcoming film 'Veer Daudale Saat' to be based on Chhatrapati Shivaji

महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधत महेश मांजरेकर यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट मराठी भाषेतील सर्वात महागडा असणार असल्याचे बोलले जात आहे. ‘वीर दौडले सात’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर या तडफदार सेनानीवर आधारित असणार आहे. ‘म्यानातुन उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात…’, हे गाणं त्यांच्यावरच लिहिण्यात आले आहे.या चित्रपटाचे नवीन पोस्टरही रिलीज झाले आहे.

महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात ‘वीर दौडले सात’ असे चित्रपटाचे नाव असल्याचे समोर आले आहे. “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३”, असे त्यांनी या पेस्टमध्ये यात म्हटले आहे.

 

 

Leave a Reply