वयाचे 47 वर्ष पूर्ण करूनही इतकी तरुण आणि सुंदर का दिसते मलायका? जाणून घ्या मालायकाच्या सुंदरतेचे रहस्य…!

0
732
mailka arora khan young beauty fitness triks tips secrets in marathi

मलायका अरोरा आपल्या ग्लॅमरस लुक, टोन्ड बॉडी शेप आणि फिटनेसकरता नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोराने आपल्या वयाची ४७ वर्षे पूर्ण केली आहेत. परंतु तिच्या चेहऱ्यावरून तिचे वय अजिबात दिसून येत नाही, अजूनही ती तेवढीच गोड आणि तरूण दिसते. आपले सौंदर्य व तारुण्य टिकून राहण्याकरिता मलायका कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स किंवा कॉस्मेटिक क्लिनिकल ट्रिटमेंट वापरत नाही. मलायका काही घरगुती नुस्खे आपल्या त्वचेला तरुण ठेवण्याकरता वापरत असते.

आज या लेखाद्वारे आपण मलायका अरोराच्या चिरतरूण सौंदर्यामागच्या  रहस्याबाबत माहिती घेणार आहोत. मलायका अरोरा आपल्या लुकला मेंटेन ठेवण्याकरता कधीही कोणतेही केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरत नाही किंवा कोणत्याही क्रीम्स वापरत नाही. ती आजही आपला चेहरा व त्वचा सुंदर राहण्याकरता घरगुती फेसपॅक नैसर्गिक फळे व पदार्थांपासून बनवते व उपयोग करते, असे ती स्वतः सांगते!malaika arora khans fitness secrets

मलायका आपल्या बॉडी टोन आणि मादक सौंदर्यामुळे वयाची 47 वर्षे पूर्ण करूनही ती एखाद्या १६ वर्षाच्या मुलीसारखी दिसते. तिने आपल्या वयाला जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष मागे आणून सोडले आहे. तिच्या या सौंदर्यामागे काही घरगुती टिप्स आहेत. त्याबद्दल तिने माहिती दिली आहे.

मलायका  रोज सकाळी उठल्यावर गरम पाण्यासोबत लिंबू आणि मध एकत्र करून पिते. तिच्या म्हणण्यानुसार हे ड्रिंक प्यायल्यामुळे डायजेशन सुरळीत होते व पोटाचे आरोग्य चांगले राहते व चरबी साठत नाही.  नियमित गरम पाणी, लिंबू आणि मधाचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो असे ती म्हणते. फिटनेस जपण्याकरता ती तासनतास जिममध्ये वर्कआउट करते.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याकरता बाजारात मिळणाऱ्या फेस मासक चा मलायका अजिबात वापर करत नाही. त्याऐवजी ती घरगुती व नैसर्गिक रित्या उपलब्ध वस्तूंपासुन स्वत: घरीच फेसपॅक बनवते. फेस मास्क व फेसपॅक बनवण्याकरता पपई, टोमॅटो, केळी अशा पदार्थांचा वापर ती करते.  ज्यामुळे नैसर्गिक घटकांचे गुण व तत्व चेहऱ्याला मिळतात.

mailka arora khan beauty secrets

दरवेळेस ती आपल्या चेहऱ्यावर नवीन फेस पॅक वापरत असते, ज्यामुळे वेगवेगळ्या फेसपॅक चे गुणधर्म त्वचेला नैसर्गिक पोषण मिळवून देत असतात. त्वचेचे सौंदर्य वाढण्याकरता मलायका दररोज क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करत असते, ज्यामुळे चेहऱ्याचे रोमछिद्र मोकळे होतात व चेहऱ्याच्या त्वचेला श्वास घेता येतो. रोज रात्री झोपण्याच्या अगोदर मलायका आपला मेकअप पूर्णपणे उतरवते आणि आपल्या चेहऱ्याला स्वच्छ करुनच ती झोपायला जाते.

ती स्वतः सांगते की कितीही थकवा आला तरी ती चेहऱ्याचा मेकअप पूर्ण काढल्याशिवाय झोपत नाही. तसेच रात्री झोपण्याअगोदर ती तिच्या भुवयांना व पापण्यांना  कॅस्टर अॉईल लावते.

तर हे होते मलाएका अरोराच्या चिर:तरुण दिसण्यामागचे रहस्य!! या घरगुती ब्युटी टिप्स तुम्ही देखील हे ट्राय करून आपले सौंदर्य नैसर्गिकरीत्या वाढवू शकतात व खुलवू शकतात. कोणत्याही ब्युटी प्रॉडक्ट्स आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट घेण्याऐवजी नैसर्गिक रित्या केलेले प्रयोग हे चांगले असतात व त्यामुळे त्वचा चिर:तरुण राहण्यास मदत होते!!

Leave a Reply