Manasi Naik Marriage Photos मानसी नाईक लग्नानंतर बनली आहे ‘मिसेस खरेरा’, बघा मानसीच्या लग्नातील हे काही खास क्षण…!

0
886
Manasi naik marriage wedding photos husband name pardeep kharera

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील ग्लॅम गर्ल शोना अभिनेत्री असलेली मानसी नाईक 19 जानेवारीला आपला प्रियकर प्रदीप खरेरा यासोबत मराठी पारंपारिक पद्धतीने पुण्यामध्ये विवाहदबद्ध झाली आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा हे एकमेकांना गेल्या वर्षापासून डेट करत होते.

मानसी नाईक मराठी सुपर डांसर व अभिनेत्री आहे. प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. प्रदीप खरेरा हा स्पोर्ट्समनसह अभिनय व मॉडलिंग चे काम देखील करतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील खुप ॲक्टिव्ह असतो. त्याचे अनेक चाहते आहेत.

मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेन्ट 2018 चा विजेता असलेला प्रदीप खरेरा आणि मराठी सुपरस्टार मानसी नाईक गेल्या काही महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये आहेत असे त्यांनी दोघांनीही जाहीर केले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी ऑफिशियल एंगेजमेंट केली होती.

काल 19 जानेवारी रोजी पुण्यामध्ये अगदी मराठमोळ्या पद्धतीने मध्ये मानसी नाईक चा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये मानसी नाईक ने डोली मधून एन्ट्री केली. राजेशाही थाटात  डोलीमध्ये बसलेली मानसी नाईक जोधा-अकबर च्या ऐश्वर्या रायच्या जोधालुक राजस्थानी पद्धतीने दागिने व वस्त्रामध्ये एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती.

आपल्या लग्नासाठी मानसीने जोधा लुक क्रिएट केला होता. ज्यामध्ये तिने पिंक कलरचा एक शाही लेहंगा परिधान केला होता. सोबतच तिचा पती प्रदीप खरेरा याने देखील गोल्डन कलर ची शेरवानी परिधान केलेली होती आणि डोक्यावर गुलाबी रंगाचा नवरदेवाचा फेटा घातलेला होता. अगदी थोड्या लोकांमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला असून मानसी व प्रदीप यांचे नातेवाईक, आई-वडील व मोजके फिल्म क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती.

चुलबुली,नटखट, हसरी असलेली आपली मानसी आता हरियाणाची सून झाली आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने वैदिक पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर आता बाकी विवाह परंपरा हरियाणा येथे होणार आहेत.

मानसी नाईकला याबद्दल विचारले असता, तिने मी खूप आनंदी आहेत व मला आता माझा सोलमेट मिळाला आहे! अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीपने देखील आपल्या इंटरव्यूमध्ये, ‘ मी आता बरेच मराठी शब्द शिकलो असे सांगून, मला मराठी पद्धतीने लग्न केल्याचा खूप आनंद झाला!’ अशी भावना व्यक्त केली आहे.

मानसी व प्रदीपच्या लग्नाकरता मराठी फिल्मस्टार्स पैकी रेशम टिपणीस दीपाली सय्यद यांनी हजेरी लावली होती. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मध्ये शाही थाटात मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांचा विवाह मोठ्या थाटात पुण्यामध्ये पार पडला.

मानसी व प्रदीप आता हरियाणाला रवाना झाले असून लग्नानंतरचे इतर प्रथा-परंपरा हरियाणाच्या पद्धतीने पार पडणार आहेत आणि आपली ग्राम गर्ल मनु उर्फ मानसी आता हरियाणाची सून झाली असून मिसेस खरेरा झाली आहे. मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांना लग्नाकरता खूप खूप शुभेच्छा…!

Manasi Naik Marriage Wedding Photos Marathi Actress –

Leave a Reply