मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर ‘या’ मुलाला करते डेट…

0
374
Marathi director Mahesh Manjrekar's daughter Sai Manjrekar is dating this boy ...

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरनं सोशल मीडियावर सक्रिय असते. सई मांजरेकर सध्या तिच्या रिलेशनशिपच्या चर्चेत आहे. सई मांजरेकर सध्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Mahesh Manjrekar

‘ सई मांजरेकर बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता, साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला याला डेट करत आहे. या दोघांनाही अनेकदा लंच आणि डिनर डेटसाठी जाताना स्पॉट केलं गेलं आहे. पण दोघांनीही फोटोग्राफर्सना त्यांचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली. मात्र त्यांच्या वारंवार एकत्र दिसण्यावरून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बीटाऊनमध्ये इतक्या रंगल्या आहेत.

 

विशेष म्हणजे सईचे वडील महेश मांजरेकर आणि सुभानचे वडील साजिद नाडियादवाला या दोघांसोबत सलमानची चांगली मैत्री आहे. सलमान खानमुळे सुभान आणि सई यांची भेट झाली. त्यामुळे अनेकदा कुटुंबीयांच्या भेटीगाठीदरम्यान सुभान आणि सईची मैत्री झाली. सुभान आणि सईच्या मैत्रीचं रुपांतर आता प्रेमात झालं असून दोन्ही कुटुंबीयांना याबद्दलची माहिती असल्याचं म्हटलं जात आहे. सई किंवा सुभानने याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मांजरेकर आणि नाडियादवाला कुटुंबाचेही चांगले संबंध असून सई आणि सुभान लवकरच रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर करणार असल्याचं समजतंय.

अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. दरम्यान सई मांजरेकरचा पहिला चित्रपट ‘दबंग ३’ प्रदर्शित झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी आपल्याला मुलीचा या चित्रपटातील अभिनय अजिबात आवडला नसल्याचं म्हटलं होतं. याशिवाय सईसोबत दिग्दर्शक म्हणून काम करण्याबाबत महेश मांजरेकर म्हणाले.

Leave a Reply