माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीची लवकरच एका नव्या भूमिकेत इंन्ट्री…

0
414
Mazhi Tuzhi Reshimgath myra vaikul The fairy of the series will soon enter in a new role

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील यश, नेहा, समीर यांच्या इतकीच लाडक्या परीची भूमिका देखील प्रेक्षकांना विशेष भावली आहे. मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ आता तिच्या सहजसुंदर आणि निरागस अभिनयाने परी याच नावाने ओळखली जाते.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत येण्याअगोदर मायरा सोशल मीडियावर हिट होती. त्यातूनच तिला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. मायराच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लवकरच मायरा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कोलीवूड प्रॉडक्शन प्रस्तुत ‘आई’ हे नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आई या गीताचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आले. या गाण्यात परी म्हणजेच मायरा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शाळेच्या गणवेशात असलेली मायरा मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. प्रवीण कोळी यांचे संगीत असलेली अनेक गीतं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.

myra vaikul

माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो ह्या लोकप्रिय गाण्याची गायिका दिया वाडकर हिने आई हे गाणं गायलं असून मायरा या गाण्यात मुख्य भूमिका साकारणार आहे. लवकरच हे गाणं प्रेक्षकांसमोर सादर होईल, त्यातच आता सर्व जण तिला आता नवीन भूमिकेत पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

Leave a Reply