मुंबई पोलिसांनी अभिनेत्री काव्या थापरला केली अटक, कारण जाणून व्हाल थक्क…

0
338
Mumbai Police arrested actress Kavya Thapar, because you will be surprised to know ...

दाक्षिणात्य सिनेमात काम करणारी अभिनेत्री पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. काव्या प्रवीण थापर हिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Police arrested actress Kavya Thapar

तमिळ सिनेमात अभिनेत्री काव्या थापरच्या गाडीचा गुरुवारी सकाळी अपघात झाला.जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलसमोर काव्याच्या गाडीचा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा काव्या दारूच्या नशेत होती. अपघात झाल्यानंतर काव्या तिथे जमलेल्या लोकांशी भांडत करत होती. तिच्या कारने एका माणसाला धडक दिली तो माणूस जखमी झाला. घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. घटनेविषयी पोलिसांनी काव्याला विचारले असता तिने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले त्यांच्याशी देखील तिने गैरवर्तन केले.

Mumbai Police arrested bollywood actress Kavya Thapar

महिला पोलीस शिपायाला शिवगाणी करुन मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी गैरवर्तणूक आणि मद्यावस्थेत गाडी चालवून एका माणसाला जखमी केल्याने तिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तिला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिनेत्री काव्या थापर ही तमिळ सिनेमात काम करते. तसेच ‘तत्काल’ या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. त्याचप्रमाणे ‘पतंजली’, ‘मेकमाय ट्रिप’ आणि ‘कोहिनूर’ सारख्या जाहिरातीत काव्या दिसली आहे. ‘ई माया पेरेमिटो’ हा तिचा पहिला तेलुगू सिनेमा २०१८मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तिने ‘मार्केट राजा’ या तमिळ सिनेमातही काम केले.

Mumbai Police Kavya Thapar

Leave a Reply