नागराज मंजुळे व अमिताभ बच्चनचा ‘झुंड’ या तारखेला चित्रपटगृहात रिलीज होणार

0
427
Nagraj Manjule and Amitabh Bachchan's 'Zhund' will be released in cinemas on this date

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात होते. नुकतीच एक पोस्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शेअर केली आहे. नागराज यांनी या पोस्टमध्ये झुंड चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

nagraj manjule Amitabh Bachhan new movie jhunad

या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. खुद्द अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही बातमी दिलीय की, झुंड कुठल्या दिवशी रिलीज होतोय. ४ मार्च दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर २०१८ मध्ये नागपूर येथे झाले होते. स्टार ‘झुंड’च्या निर्मात्यांनी अधिकृत फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च केले आहे.

Jhund movie

अमिताभ बच्चन हे झुंड या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा पोस्टर त्यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिग बी यांनी पोस्टमध्ये लिहिले, आमची टीम तुम्हाला भेटायला येत आहे. झुंड चार मार्चला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपला फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 18 जून रोजी रिलीज होणार होता, पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

नागराज मंजुळे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चित्रपटाची तारीख दिलीय. त्यांनी एक पोस्टरदेखील शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातात फुटबॉल आहे. आजूबाजूला झोपडपट्टी वस्ती दिसत आहे. झुंड हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात काय कामगिरी करतोय हे पाहून महत्तवाचे ठरणार आहे.

nagraj manjule Amitabh Bachhan new movie

Leave a Reply