दमदार चित्रपटांमुळे ‘या’ दिग्दर्शकाला मिळवली डॉक्टरेट पदवी, प्रेक्षक वर्गाचे कौतुक

0
370

मराठी चित्रपट सृष्टीला दमदार चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नुकतीच डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. ही पदवी प्राप्त करतानाचा एक खास फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि यामुळे त्यांचं सर्व प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे.

nagraj manjule d y patil

नागराज मंजुळे यांनी फँड्री, सैराट, पिस्तुल्या, नाळ आणि झुंड अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. आणि नागराज मंजुळे यांचे चित्रपट मुळात वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांच्या याच योगदानाबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाने D. Litt ची पदवी देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

nagraj manjule director gets doctorate for his energetic films, acclaimed by audiences

फँड्री, नाळ या त्यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांना अगदी आपलेपणात ओढले. त्यांनी या चित्रपटातू नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर एक अभिनेता बनून प्रेक्षकांसमोर आले. सैराट हा त्यांनी प्रेक्षकांसमोर आणलेला चित्रपट सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. त्यानंतरच्या झुंड या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. झुंड चित्रपटाबद्दल आजही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

nagraj manjule Amitabh Bachhan new movie jhunad

त्यामुळे एक वेगळ्या धाटणीचे आणि प्रेक्षकांच्या जवळच्या गोष्टींचे कथा कथन त्यांनी केले. दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव कायम घेतले जाते. त्यांच्या याच कार्याची दखल डी वाय पाटील विद्यापीठाने घेतली. एके काळी एमफिल करण्याची इच्छा असलेल्या नागराज मंजुळे यांनी पुणे विद्यापीठात अनेक चकरा मारल्या होत्या. परंतु आज ही डॉक्टरेटची पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या जवळच्यानी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

Leave a Reply