पुन्हा एकदा नागपूरात शुटींग करायचीय, नागपूरकरांनी केलेला मानसन्मान लाखमोलाचा

0
354
Once again we want to shoot in Nagpur, the honor done by the people of Nagpur is worth lakhs

जीवनात मला अनेक मानसन्मान मिळाले, सत्कारही खूप झालेत. पण हा नागपूरकर भगिनींनी आज माझा केलेला सत्कार लई भारी आणि मी मरेपर्यंत हा सत्कार विसणार नाही, असे त्यांना नागपूरकरांना उद्गेशून म्हंटले.

nagraj manjule director gets doctorate for his energetic films, acclaimed by audiences

झुंड चित्रपटाच्या सक्सेस नंतर नागराज मंजुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत भविष्यात संधी मिळाल्यास पुन्हा नागपुरात शूटिंग करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

झुंड चित्रपटाच्या निमित्ताने समाजातील वास्तव व नागपूरकर कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल संयुक्त महिला सत्कार समितीच्या वतीने रविवारी दीक्षाभूमी येथील सभागृहात मंजुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नागराज म्हणाले, अनेक महिलांनी मिळून माझा सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नागपूरकर भगिनींनी हारतुरे देऊन केलेले कौतुक व पाठीवर ठेवलेला हात सदैव आठवणीत राहणार आहे.

Nagraj Manjule

पुढे त्यांनी, झुंड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नागपुरात घडलेले किस्से व आठवणींना यावेळी उजाळा देत, पुन्हा नागपूर मध्ये शुटींग करण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची स्तुती देखील केली. नागपूरची ही मुले स्टार असून, भविष्यात मोठी होऊन शहराचे नाव कमावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply