‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले प्रत्युत्तर…

0
391
Nagraj Manjule responds to criticism from 'Zhund' ...

नागराज मंजुळे यांचा दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अवघ्या पाच दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दमदार कमी केली आहे. बॉलिवूड बिग बी ‘अमिताभ बच्चन’ यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. तर काहींनी या चित्रपटावर आपले चांगले व वाईट माध्यमातून मत मांडले आहे. दरम्यान नुकतंच नागराज मंजुळे यांनी देखील या टीकांना फुस्कारून लावले आहे. या चित्रपटावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीका सुध्दा होताना दिसत आहेत. मात्र या टीकांना मी चित्रपटाच्या माध्यमातून उत्तर दिल्याचे नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.

Nagraj Manjule

 

नागराज मंजुळेंनी दिले प्रत्युत्तर –

काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली, त्या वेळेस ते म्हणाले, झुंड चित्रपटाबद्दल, त्यातील कलाकारांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी या चित्रपटावर होणाऱ्या टीकेबद्दलही प्रत्युत्तर दिले. यावेळी नागराज मंजुळे म्हणाले, “सोशल मीडिया हे माध्यम मला मशिनसारखे वाटते. त्याला डोकं नसतं. चेहरा नसतो. त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या टीकांना मी गांभीर्याने घेत नाही.”

“जर एखाद्या व्यक्तीला या चित्रपटाबद्दल खरच तक्रार करायची असेल तर त्याने माझ्यासमोर येऊन करावी. सोशल मीडियावर अनेकजण तक्रार करतात. या चित्रपटात जर काही चुका असतील तर त्या मला येऊन बोलाव्यात. आणि त्या जर तुम्ही मला प्रत्यक्ष सांगितल्या तर तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे हे माझ्या लक्षात येईल”, असेही नागराज मंजुळे म्हणाले. दरम्यान बॉलीवूड पासून या चित्रपटाचे कौतुक होत आहे, यात अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक व नागराज मंजुळेना शुभेछया दिल्या आहेत.

Leave a Reply