देवमाणूस २ मालिकेत नवीन एन्ट्री, प्रदर्शित प्रोमोची चर्चा सर्वत्र सुरू….

0
566
New entry in Devmanus 2 series, discussion of the displayed promo starts everywhere ....

प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर श्वेता शिंदे दिग्दर्शक देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला आणली आहे. देवमाणूस ही मालिका फार कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहचली. यामध्ये डॉ.अजित कुमार देवचे करस्थान या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतात.

Devmanus 2 new entry Vaishnavi Kalyankar

त्यामुळे या मालिकेत वेगवेगळ्या अभिनेत्रीची बऱ्याचदा चर्चा होते. सर्वांना माहित असेल तर डॅाक्टर त्याचे ध्येय्य साध्य झाले की त्या व्यक्तीचा नामोनिशाण मिटवून टाकण्यात आता चांगलाच पटाईत झाला आहे. अशातच आता त्याने डिंपलच्या मदतीने निलमचा काटा काढला आहे.

मालिकेतून निलमच्या पात्राची एक्झिट झाल्यानंतर शिवानी भावुक झाली होती. निलमचा प्रवास तर संपला आता या कारस्थानात सोनूची एन्ट्री झाली आहे. ही सोनू गडगंज श्रीमंत असून आपल्या जागेच्या व्यवहारात अडचणी आल्याने ती डॉक्टरची मदत मागायला वाड्यात येते. मात्र डॉक्टरची तिची भेट होत नसते अशातच बज्या सोनूला उचलून डॉक्टरकडे घेऊन येतो आणि तिच्यावर उपचार करायला सांगतो. या उपचारावट सोनू डॉक्टरचे आभार मानत त्यांना डॉक्टर अंकल म्हणते.

Devmanus 2 new entry

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, डॉक्टर सोनूला त्याच्या जाळ्यात कसा ओढतो हे पुढील भागात प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.

देवमाणूस २ या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हि आहे. वैष्णवी कल्याणकर ही सोशल मीडिया बरीच सक्रिय असते. स्नृत्यासोबतच वैष्णविला अभिनयाची विशेष आवड आहे.

धर्मा मुव्हीज क्रिएशन च्या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेबसीरिजमध्ये वैष्णवीने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या वेबसिरीजचे जवळपास ११ व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

अभिनय आणि नृत्याची आवड असलेल्या वैष्णवीने सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळवली असून लवकरच ती आपल्याला ‘देवमाणूस’ या मालिकेत दिसेल. आता या मालिकेत पुढे काय काय होईल, याबद्दलची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Reply