‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नवा ट्विस्ट; मिथिला सिम्मीचा करणार पर्दाफाश

0
378
New twist in Mazhi Tuzhi Reshimgath Mithila will expose Simmi

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सध्या एका रंजक वळणावर आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका म्हणून चर्चेत आहे. चौधरी यांच्या पॅलेसमध्ये नेहा आणि परीचा समावेश झाल्यानंतर या कुटुंबाच रुप अगदी पालटून गेलं होतं. पहिल्यांदाच त्यांचं कुटुंब एकत्र आणि आनंदो कुटुंबाप्रमाणे राहू लागलं होतं. मात्र सिम्मीला हे काही बघवत नाहीय.त्यामुळे ती सातत्याने काही षडयंत्र रचत असते.

New twist in Mazhi Tuzhi Reshimgath Mithila

नुकताच इंस्टाग्रामवर मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. यात नेहमी गप्प बसणारी, सिम्मीचं सगळं ऐकून घेणारी मिथिला पहिल्यांदाच तिच्या विरोधात बोलताना दिसणार आहे. मिथिला सिम्मीची सगळी कारस्थान माहिती असूनही आजपर्यंत ती कायम शांत राहिली. पण आता मात्र ती गप्प राहणार नाहीय.

काय आहे प्रोमोमध्ये ?
प्रोमोमध्ये मिथिला सिम्मिचं दरवाज्यामागे उभे राहून बोलणं ऐकते. आणि मिथिला सिम्मीला ती चुकतं असल्याचं सांगते. नेहाने काय बिघडवलंय असं विचारते. यावर सिम्मी तिला गप्प राहण्याचा सल्ला देते. कुठे काही बोलीस तर याद राखा असा इशारा देते. यावर मिथिला तिला आपण यावेळी गप्प बसणार नाही असे सांगते .

Mazhi Tuzhi Reshimgath Mithila will expose Simmi

Leave a Reply