नितीन गडकरींची मांडली भन्नाट संकल्पना, पाहूयात काय आहे ही संकल्पना!

0
382
Nitin Gadkari Mandali Bhannat concept lets see what this concept is

केंद्र सरकारकडून रस्तांच्या पायाभूत सुविंधासाठी आता परदेशी गु्ंतवणूकांकडून निधी घेतला जाणार नाही. त्याउलट हा सर्व निधी लहान लहान गुंतवणूकदारांकडून स्वीकारला जाईल. सरकार या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी १ लाख रूपये गुंतवण्यास इच्छुक असलेल्या लहान लहान गुंतवणूकदारांना दरवर्षी ८ टक्के परतावा निश्चित केले आहे. ही माहिती सदर केंद्रिय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे.

nitin gadkari

पुढे ते असही म्हणाले, शहरे व शहरांमधील रोड ओव्हरब्रिज बांधण्यासाठी ८ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पावर काम सुरु केले आहे. शिवाय मंत्रालय यामध्ये ५ लाख कोटीहून अधिक रूपयांवर वार्षिक काम करतेय. ते असही म्हणाले, की बरेच असे परदेशी गुंतवणुकदार आहेत की, ज्यांना यांत पैसे गुंतवायचे आहेत, पण मला मात्र यांत काडीमात्र रस नाही आहे.

nitin gadkari maharashtra

मला श्रीमंतानाच श्रीमंत करायचे नाही, त्याऐवजी मी शेतकरी , शेतमजूर, लहान -लहान उद्योजक, हवालदार, कारकून यांच्याकडून पैसे घेणं मी स्वीकारेन. शिवाय येत्या काही वर्षाच सोलापूर, सांगली, नाशिक येथे ड्रायपोर्ट सुरू करण्यात येईल. यात उत्पादन पूर्वक सुविधा उपलब्ध असणार आहेत. येत्या काही वर्षात अशाच पायभूत सुविंधामध्ये सुधारणा आणि अधिक पायभूत विकास प्रकल्प येतील असे नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.

nitin gadkari news

Leave a Reply