अरे व्हा ! डिजिटल भारततला डिजिटल भिकारी पाहिलात का ? पहा व्हायरल व्हिडीओ…

0
349
Oh my gosh Have you seen digital beggars in digital India Watch the viral video ...

भारतात काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत असल्याचं दिसत आहे. आता तर अर्थव्यस्थेतही चलनाबाबतच्या नवनवीन घोषणा केल्या गेल्या. आता भारतभर लोक जास्तीस्त जास्त रोख रक्कम, चिल्लर सोबत बाळगण्याऐवजी डिजीटल पेमेंटचा पर्याय अवलंबित करत आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा अनेक प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोक पेमेंट करू लागले आहेत. पण हे जरा नवलच आता लोकांसोबतच आता भिकारी सुद्धा डिजीटल पेमेंट वापरत असल्याचं आढळत आहे. पहा या भिकाऱ्याच्या व्हायरल व्हिडीओ.

digital india beggars

हा व्हिडीओ बिहार मधील आहे. सध्या हा सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. बिहारमधील हा भिकारी राजू पटेल याचा आहे. मंगळवारी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राजू पटेल यांनी भीक मागण्याची पारंपारिक पद्धत सोडली आणि त्याने फोनपे, डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट अॅप वापरण्यास सुरुवात केलेली आहे. या भिकाऱ्याला काही लोकांनी “भारताचा पहिला डिजिटल भिकारी” असे नाव सुद्धा दिले आहे. दरम्यान, तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरतेने गरिबी दूर करण्याकडे एक पाऊल उचलले आहे याकडेही काही लोकांनी लक्ष वेधले आहे.

हे कितपत चांगले आणि कितपत वाईट याकडे खरे लक्ष लागले आहे. भिकारी कमी करण्यासाठी, नोकर्‍या देण्यासाठी सरकार पुरेसे करत नाही हे वाईट आहे आणि हे लोक स्वतःला भीक मागण्यात समाधान मानतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वत: साठी काही करत नाहीत,” एका ट्विटर यूजरने आपलं मत मांडलं आहे. या व्हिडिओवर बऱ्याच नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

Leave a Reply