शिवजयंती दिवशी ३ शिवप्रेमीचा दरीत कोसळून अपघात

0
380
On the day of Shiva Jayanti, 3 Shiva Premi fell into the valley and had an accident

१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहाने साजरी केली. परंतु अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रात अशा अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत. शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने भोर इथून तीन तरूण एकाच मोटारसायकल वरून निघाले होते. घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले.

भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट निघालेल्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला. भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फूट दरीत कोसळली. कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून शिवजयंती साजरी न झाल्याने यंदा अधिक उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली.

 

या शिवप्रेमीची नाव केतन देसाई( 23) प्रथमेश गरुड (25) आणि किरण सुर्यवंशी (20) हे तरूण गाडीवरून पडल्यामुळे जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारा घडली. वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाला असल्याची प्राथमिकमाहिती मिळली आहे. अपघातामध्ये तिघेजण एकाच मोटारसायकलवर होते. गाडीवरील संयम सुटल्याने हा प्रकार घडला आहे. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी त्यांना जवळच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात केले. एकाला किरकोळ लागले असल्याने प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे, दोघेजण तिथल्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत.

Leave a Reply