रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आठव्या दिवशी सुरुच आहे. रशियाने युक्रेनला चारीबाजुने घेरले तरी युक्रेनने जोरदार टक्कर दिली आहे.तर आता रशियाचे एक ब्रह्मास्त्र युक्रेनवर भारी पडणार आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रशियाचे सैन्य अखेर कीव्हमध्ये पोहोचलाचा दावा केला आहे. युक्रेनची राजधानी पादाक्रांत करण्यास सुरूवात करण्यात येत आहे. याबाबत रशियाच्या लष्कराने व्हिडिओ जारी केला आहे. ‘युद्ध संपेपर्यंत युक्रेनवर हल्ले थांबवणार नाही, असे सांगत रशियाने युक्रेनविरोधात घातक हत्यार उपसले आहे. रशिया S- 400ने युक्रेनवर हल्ला करणार आहे.
रशियन फौजांनी युक्रेनच्या शहरांमध्ये हाहाकार माजवला आहे. मात्र युक्रेनने रशियन आर्मीला जशास तसे उत्तर दिले आहे. युक्रेनचे एक ब्रह्मास्त्र रशियावर भारी पडले आहे. रशियाच्या हल्ल्यांनी युक्रेन बेजार झाले आहे. मात्र युक्रेनचा अजून पराभव झालेला नसून युक्रेनविरूद्ध रशियाने आता आपलं ब्रह्मास्त्र काढले आहे. काय आहे हे ब्रह्मास्त्र?याशिवाय युक्रेनच्या 15 शहरांवर रशियाने एकाच वेळी हवाई हल्ले करण्याची रणनीती आखलीय. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.
दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी घोषणा केली आहे की, ‘युद्ध संपेपर्यंत युक्रेनवर हल्ले थांबवणार नाही. रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर मिसाईल्सचा भडीमार सुरू केलाय. कीव्हचं सेंट्रल रेल्वे स्टेशन उडवून दिले आहे. तर खेरसन शहरही रशियाने जिंकलंय.
अनेक देश रशियावर हल्ल्याच्या तयारीत आहेत, असे लावरोव्ह यांनी म्हटले आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत रशियन मंत्र्याना दावा केला आहे.
युक्रेनने रशियाला वारंवार ड्रोनद्वारे हल्ले करून बेजार केले आहे. रशियन ताफ्यांवर, त्यांच्या चिलखती गाड्यांवर, रणगाड्यांवर युक्रेनने प्रभावी ड्रोन हल्ले केले.युक्रेनविरोधात रशियानं आपली S- 400 ही एअर डिफेन्स सिस्टीम बाहेर काढली आहे. रशियन फौजांनी S- 400 मिसाईल सिस्टीमद्वारे युद्धाभ्यास सुरू केलाय. आता या सगळ्या वेगवान ड्रोन्सविरोधात S- 400 सिस्टीम वापरली जाईल.