दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांच्या तोडीचा आपला महासिनेमा…; प्रवीण तरडे यांचे आवाहन चर्चेत

0
375
Our great cinema of southern and Hindi films ... Praveen Tarde appeal under discussion

अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चित्रपटगृहात हाऊसफुल्ल सुरू आहे. संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस उतारला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा आबालवृद्धांना आवडत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे यांनी एक आवाहन केले आहे.

स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रवीण तरडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांच्या तोडीचा आपला महाराष्ट्राचा महासिनेमा थिएटरमध्येच पाहूया! असे कॅप्शन देत प्रेक्षकांना आवाहन केले आहे

काय म्हणाले प्रवीण तरडे?

नमस्कार मी प्रविण विठ्ठल तरडे, तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर किंवा मित्रमंडळीमध्ये हा व्हिडीओ नक्की शेअर करा. आपला सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट जगभर प्रदर्शित झालाय. आपली नेहमी ओरड असते की आपला चित्रपट साऊथच्या जोडीचा किंवा बॉलिवूडच्या जोडीचा का नाही. मित्रांनो सरसेनापती हंबीरराव तसाच बनला आहे. सर्व महाराष्ट्रात तुडूंब प्रतिसादात चालला आहे. पहिल्या तीन दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

pravin-tarde-in-as-sarsenapati-hambirrao-movie-poster

मित्रांनो माझी या व्हिडीओद्वारे एकच विनंती आहे की, आपला चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा. तो टीव्हीवर पाहू किंवा व्हिडीओ लीक झाल्यावर पाहू, यात मजा नाही. आपला मराठी चित्रपट हा आपण चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे. सोबत सहकुटुंबला घेऊन जा. चित्रपट पाहिल्यावर कमेंट करुन मला टॅग करा. तसेच बुक माय शो आणि IMDb वर रिव्ह्यू लिहा. यावरुनच इंटरनॅशनल पातळीवर चित्रपटाची किंमत ठरवते, असे प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply