या गाण्याचे ‘रमजान’ व्हर्जन’ गाऊन पाकिस्तानी कलाकार फसला, नेटकऱ्यांकडून होतोय ट्रोल

0
348
Pakistani artist fails to sing 'Ramadan' version of this song, is being trolled by netizens

गेल्या काही महिन्यांपासून ‘कच्चा बदम’ या गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आता हे गाणे पाकिस्तानमध्ये देखील चर्चित होत आहे. सध्या कच्च्या बदामाच्या गाण्याचे ‘रमजान व्हर्जन’ पाकिस्तानमध्ये समोर आले आहे, त्या पाकिस्तानी कलाकाराला ते चांगलेच महागात पडले आहे.

कच्चा बदाम या गाण्याने केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला असून, सर्वांनी यावर ठेका धरला होता. प्रत्येकजण ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर रील टाकून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असून त्याला खूप व्ह्यूज मिळत आहेत. हे गाणे गायलेले बंगाली भुईमूग विक्रेते भुबन बद्यकर ने गायले असून तो रातोरात लोकप्रिय झाला.

Pakistani artist fails to sing 'Ramadan' version

दरम्यान, आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये कच्च्या बदामाच्या गाण्याचे ‘रमजान व्हर्जन’ समोर आले आहे. एका पाकिस्तानी कलाकाराला या गाण्याचे रमजान व्हर्जन बनवून भुबनसारखी लोकप्रियता मिळवायची होती. मात्र, त्याचा हा डाव फसला आणि लोकांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. रॉ बदामची ही रीमिक्स आवृत्ती पाकिस्तानमधील विचित्र व्हायरल व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या यासिर सोहरवर्दी या यूट्यूबरने गायली आहे. यासिर सोहरवर्दी यांनी हे गाणे त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. लोकांना ते गाणे आवडले नाही म्हणून मग लोकांनी त्याला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली.

यासिरने या गाण्याचे नाव ‘रोजा रखूंगा’ असे ठेवले आहे. काही लोकांनी यासिरचे त्याच्या गाण्यांचे कौतुकही केले आहे. तर गाण्यात प्राण्यांच्या आवाजाची नक्कल केल्याबद्दल यासिरची बहुतांश लोकांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे बहुतांश लोकांनी म्हटले आहे, त्यामुळे त्याला बरंच ट्रोल केलं जातं आहे.

Leave a Reply