‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रार्थना बेहरे बाहेर? कारण आले समोर

0
337
Prarthana Behere, out of the series 'Majhi Tujhi Reshimgaarh' Because the front came

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेतील मायरा या बालकारकरासह इतर कलाकारांनी सर्वांचीच मन जिंकली आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांच्या अभिनयामुळे अनेकांना ही मालिका अनेकांना पसंत पडत आहे. पण सगळं छान असताना मालिकेत परीची आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे मालिकेतून बाहेर पडल्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबतचे खरे कारण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या मालिकेत ‘नेहा’ ची भूमिका करणारी प्रार्थना लंडनला जात असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे मालिकेत पुढचे काही दिवस ती दिसणार नाही. असे अनेकांच्या लक्षात आले. प्रार्थनाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. यापुढे मालिकेत प्रार्थना पुढील भागात ती दिसणार नाही. यामुळे तिचे चाहते नाराज आहेत.

हे आहे कारण

प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून ती खऱ्या आयुष्यात लंडनला गेली आहे. प्रार्थना तिच्या पतीसोबत लंडनवारी करत आहे. या व्हिडीओला तिने छान कॅप्शनही दिले आहे. तिने या व्हिडीओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला टॅग करत ‘आम्ही लवकरच येतोय’ असं म्हटल आहे. सोनाली कुलकर्णी ही लंडनमध्ये वास्तवयास आहे. सोनालीने लॉकडाऊनमध्ये लग्न केले होते. मात्र ती पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याची तयारी करत आहे. आधी केलेल्या लग्नात लॉकडाऊनमुळे कोणालीही उपस्थितीत राहता आले नव्हते. त्यामुळेच ती पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्न करणार आहे. याच लग्नाला उपस्थित राहण्यासाठी प्रार्थना लंडनला गेली असल्याचा अंदाज अनेकांनी लावला आहे.

 

Prarthana Behere Photos Download

Leave a Reply