निळू फुले यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या शुभेच्छांमध्ये प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

0
371
nilu fule prasad oak

मराठी अभिनेता, दिगदर्शक, निर्मीता प्रसाद ओक लवकरच दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. त्यात आज मराठी एनर्जीटीक नेतृत्त्व असणारे निळू फुले यांची जयंती आहे. आणि म्हणून आज त्यानिमित्तानं प्रसाद ओकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर निळू फुले यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.

Prasad Oak शेअर केलेली पोस्ट –

निळू फुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रसाद ओकनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, ही पोस्ट लिहिताना प्रसाद ओक भावुक झालेला दिसत आहे. प्रसाद ओकनं त्याच्या पोस्टमध्ये निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांनाही टॅग केलं आहे. आपल्या या पोस्टमधून त्यानं निळू फुले यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.prasad oak

Prasad Oak ह्या पोस्ट मध्ये काय लिहले ते वाचा –

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये प्रसाद ओकनं लिहिलंय, ‘निळूभाऊ…आज तुमचा वाढदिवस…! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं…अनुभवता आलं… तुमच्याकडून बरंच काही शिकलो… तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन ‘गुरु’च मानलं… तुमचा आशीर्वाद म्हणूनच कि काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली ‘गुरुदक्षिणा’ असेल…! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ…!’

प्रसाद ओकची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. दरम्यान, २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक असून, त्यांच्या भूमिकेत कोण दिसणार याबद्दलची अधिक कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

Leave a Reply