राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील पती आहेच खूपच डॅंशिग, त्यांची लव्हस्टोरी आहे रोमांचक!

0
345
Radhika's real life husband is very dancing, his love story is exciting

झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेदतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. या मालिकेतील राधिका या भूमिकेने तिने प्रेक्षकांचे मन जिंकली. एक सामान्य गृहिणीपासून ते मोठी उद्योजिका होण्यापर्यंतचा खडतर प्रवास तिने सादर केला होता.

Anita Date

माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिका संपली असली तरी, अनिता राधिकाच्या रूपात अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिच्यासंदर्भात प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर आज अनिता दातेच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याविषयी थोडसं जाणून घेऊया.

अनिता आणि चिन्मय दोघे पुण्यातील ललित कला केंद्र येथे एकत्र शिकत होते. मात्र, यादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले नाही. पण नाटकादरम्यान एकत्र काम करताना त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. अनिता आणि चिन्मय ‘सिगारेट्स’ या नाटकात एकत्र काम करत होते. या नाटकाच्या तालमीसाठी ते अनेकवेळा भेटत असत. या नाटकादरम्यान त्यांच्या भेटी वाढल्या, जवळकी वाढली. त्यानंतर दोघांनीही एके दिवशी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर दीड वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर अखेर ते विवाहबंधनात अडकले. लग्नानंतरही ते दोघे नवरा-बायको कमी तर एकमेकांचे मित्र-मैत्रीण म्हणूनच जास्त राहत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते.

दरम्यान लवकरच अनिता दाते ‘मी वसंतराव’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply