‘हा’ साऊथ अभिनेता आहे करोडोचा मलिक,आहे या या कंपनीचा मालक!

0
383
Ram Charan South actor is the owner of crores, he is the owner of Plane company

सध्या बॉलिवूड प्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची जरा जास्त चर्चा होत असते. नुकतीच आरआरआर चित्रपटाची २५ मार्च, २०२० ही रिलीज डेट समोर आली. या चित्रपटाते एनटीआर ज्युनियर, अजय देवगण, आलिया भट्ट आणि साऊथ स्टार राम चरण यांच्या मुख्य भूमिका आहेत. राम चरण हा अभिनेता तर सर्वांचा लोकप्रिय असा अभिनेता आहे. एस एस राजमौलीच्या या चित्रपटात राम चरण रामाराजूच्या भूमिकेत आहे. राम चरण याने आपले वडील आणि लोकप्रिय अभिनेते चिरंजीवी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत साऊथमध्ये लोकप्रियता मिळवलीय.

ram charan chiranjeevi
ram charan & his father chiranjeevi

तुम्हाला जर माहित असेल तर, राम चरण हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथे कोटींच्या बंगल्यात राहतो. त्याची स्वत:ची एअरलाईन कंपनीदेखील आहे. जाणून घेऊया त्याच्याविषयी. साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण साऊथ चित्रपटातील अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्याने वडिलांच्या स्टारडमशिवाय जगात विशेष ओळख निर्माण केली आहे. राम चरण आजही आपली लाईफ लक्झरी आणि रॉयल जगतो.ramcharanyevadu

हैदराबादच्या प्राईम लोकेशनवर त्याचा कोटींचा बंगला आहे. साऊथचा सुपरस्टार राम चरणचा जन्म २७ मार्च, १९८५ रोजी रोजी चेन्नई येथे झाला. त्याने २००७ मध्ये पुरी जगन्नाध यांच्या ‘चिरुथा’ चित्रपटातून पदार्पण केले. त्याने २०१६ मध्ये ‘कोनिडेला प्रोडक्शन कंपनी’ नावाने आपले प्रोडक्शन हाऊस उघडले. रामचरण हा एका विमान कंपनीचा मालक देखील आहे. याशिवाय त्याची हैदराबाद पोलो रायडिंग क्लब नावाची पोलो टीमही आहे.

रामचरणने बॉलिवूडमध्ये एकच चित्रपट केला. अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट ‘जंजीर’च्या रिमेकवर याच नावाने २०१३ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रासोबत काम केलं होतं. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकासा चालला नाही.

Leave a Reply