रणबीर-आलियाच्या लग्नात रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या कमेंटची चर्चा

0
393
ranbir alia of Ranbirs ex-girlfriends comment on Alia wedding

बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा नुकताच विवाहसोहळा पार पडला, त्यानंतर लगेचच आलियानं आपल्या विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली. आलियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोंसोबत एक छान अशी कॅप्शन देखिल लिहिली आहे. बऱ्याच चाहत्यांनी व सेलिब्रेटींनी देखील कमेंट करत या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफचा देखील समावेश आहे. आलियाच्या फोटोवरील कतरिनाची कमेंट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

alia-insta

आलिया भट्टच्या इन्स्टाग्राम पोस्टवर सोनम कपूर, जेनेलिया डिसूजा, माधुरी दीक्षित, टाइगर श्रॉफ, तमन्ना भाटिया, जान्हवी कपूर, अनिल कपूर, सोनू सूद, दीया मिर्जा, मौनी रॉय, मनीष मल्होत्रा यासांरख्या सेलिब्रेटींनी कमेंट करून तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण त्यात चर्चेत आहे ती कतरिना कैफची आलियाच्या लग्नाच्या फोटोवरील कमेंट.

आलियाच्या या पोस्टवर कमेंट करताना कतरिनानं कमेंट केली आहे. तिने लिहिलं, ‘तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. खूप सारं प्रेम, मी तुमच्या आनंदाची कामना करते. तुमचं आयुष्य आनंदानं बहरुन जावं हीच इच्छा.’ अशी कमेंट कतरिना ने केली आहे. ही कमेंट सध्या चर्चेत असल्याचं कारण असं की कधी काळी कतरिना रणबीर ची एक्स गर्लफ्रेंड होती. त्यामुळे ती आणि तिची कमेंट चर्चेत आहे.

Alia & Ranbir Wedding Photos-

Leave a Reply