रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या अफेअरची घडी पुन्हा उघडली, रश्मिका म्हणाली…

0
346
Rashmika Mandana-Vijay Devarkonda affair reopened, Rashmika said

‘पुष्पा: द राईज या चित्रपटाच्या सक्सेस नंतर साऊथची हाएस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक रश्मिका ठरलीय. अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या जोडीने सर्वांना वेड लावलं आहे. पण सध्या रश्मिका ‘लायगर’ स्टार विजय देवरकोंडासोबत रिलेशन असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Rashmika Mandanna Vijay Devarakonda loces

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी आतापर्यंत एकत्र दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या चित्रपटांचं नाव ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ असे आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर पुन्हा रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशीपची चर्चा रंगली आहे.

Rashmika Mandanna Vijay Devarakonda

विजय देवरकोंडा आणि रश्मिकाला अनेकदा एकत्र स्पॉटदेखील करण्यात आले होते. दोघांनीही कधीही आपल्या रिलेशनशीपविषयी कुठलीच माहिती समोर आणली नाहीय. सध्या या दोघांबद्दलच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकमेकांना डेट करत असलेल्या या दोन्ही स्टार्सना मुंबईमध्ये डिनर डेट आणि गोवा ट्रिपला देखील पाहण्यात आले होते. आणि रश्मिका मंदाना ने देखील एकदा म्हंटले होते की तिला विजय देवरकोंडा ची भीती वाटते.

rashmika mandanna crush

रश्मिका म्हणाली की, ती ज्या लोकांना पहिल्यांदा भेटते, त्यांची तिला भीती वाटतेच. ‘गीता गोविंदम’च्या शूटिंगवेळी ती पहिल्यांदा विजयला भेटली होती. पण, दुसऱ्यांदा चित्रपट ‘डियर कॉम्रेड’पर्यंत तिने विजय तिने चांगले पारखले. डियर कॉम्रेड’च्या प्रमोशनवेळी रश्मिकाने सांगितलं होतं की. जेव्हा ती विजयला भेटली तेव्हा तिला नंतर समजलं की, तो खूप ‘चिल फेलो’ आहे.

Leave a Reply