अब्जाधीश रतन टाटा ह्यांनी का केले नाही लग्न ? स्वत: केले हे सिक्रेट शेअर

0
608
ratan-tata-marriage-story-marathi-trends-reson

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी कधीही कुणाशीही लग्न केले नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की रतन टाटा ह्यांना प्रेमाची कधी बाधाच झाली नाही. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: आपल्या लव्ह लाइफचा उल्लेख केला होता.

त्यांच्या आयुष्यात प्रेमाने एक वेळा नव्हे तर तब्ब्ल चार वेळा त्यांच्या ‘दिला’ चा दरवाजा ठोठावला. पण आयुष्यातील खडतर कालखंडा पुढे त्यांच्या प्रेमाला माघार घ्यावी लागली. आणि त्या नंतर रतन टाटा ह्यांनी ‘तेरी गलियों में न रखेंगे कदम आज के बाद’ म्हणत लग्नाचा पुन्हा कधीच विचार केला नाही.

रतन टाटा ह्यांच्या ८३ व्या वाढ दिवसा निमित्त आज आपण त्यांच्या आयुष्यातील ह्या अँगल विषयी हि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी सूरत येथे झाला. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आणि स्वतःचे असे एक वेगळे स्थान हि निर्माण केले. त्यांनी टाटा समूहाला नवीन उंचीवर नेण्याचे काम केले. रतन टाटा ह्यांनी व्यवसाय जगतात बरेच नाव कमावले पण ते प्रेमाच्या बाबतीत अपयशी ठरले.

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अविवाहित उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या लव्ह लाइफविषयी खुलासा केला आहे. ते म्हणाले की त्यांचे ही कधी कोणावर प्रेम होते, पण त्यांच्या प्रेमाची ‘परिणीती’ लग्नात कधीच होऊ शकली नाही, ह्याची खंत त्यांना कायम असते .

टाटा म्हणतात कि , आज मागे वळून आयुष्याकडे पाहतांना असे वाटते कि आपण अविवाहित राहिलो हेच बरे झाले , कारण जर लग्न केले असते तर ही कदाचित हि परिस्थिती खूपच क्लिष्ट झाली असती.

ते म्हणतात कि, जर तुम्ही मला विचारले कि तुम्ही कधी कोणावर प्रेम केले आहे का ? तर मी सांगेन कि एक , दोन वेळा नव्हे तर तब्ब्ल चार वेळा मला ह्या इश्काची बाधा झाली आणि चारही वेळेस मी लग्नाचा गम्भीर पणे विचार केला होता. पण काही ना काही कारणाने मला माघार घ्यावी लागली.

आपल्या प्रेमाच्या दिवसांबद्दल बोलताना टाटा म्हणाले कि, ‘जेव्हा मी अमेरिकेत काम करत होतो तेव्हा मी प्रेम आणि लग्न ह्या विषयांचा जास्त विचार करत होतो पण काही दिवसांनी मला भारतात परत यावे लागले आणि त्यामुळे प्रेम आणि लग्न हे दोघे ही विषय मागे पडत गेले , आणि कालांतराने मी ह्या विषयाचा विचार करणे ही सोडून दिले.’

रतन टाटा ह्यांच्या मैत्रिणीला भारतात यायचे नव्हते. आणि नेमके त्याच वेळी भारत-चीन युद्धही भडकले. शेवटी, त्यांच्या मैत्रिणीने अमेरिकेत कोणाशी तरी लगीन गाठ बांधली. आपण ज्याच्या प्रेमात पडलो ती व्यक्ती अजून ही त्याच शहरात आहे का असे विचारले असता त्यांनी होकारार्थी असे उत्तर दिले, पण या संदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यास त्यांनी नकार दिला.

रतन टाटा यांचा जन्म समृद्ध कुटुंबात झाला पण त्यांचे आयुष्य इतके सोपे नव्हते. रतन टाटा अवघ्या ७ वर्षाचे असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले आणि त्या नंतर त्यांचे सर्व पालन पोषण त्यांच्या आजीनेच केले.

रतन टाटा यांना मोटारींची खूप आवड. त्यांच्या नेतृत्वा खाली टाटा समूहाने लँड रोव्हर, जग्वार, रेंजरोव्हर सारख्या कम्पन्या ताब्यात घेतल्या. भारताला ‘लखोटिया कार’ म्हणजे फक्त एक लाख रुपयात टाटा नॅनो सारखी कार ची भेट मिळण्याचे भाग्य देखील रतन टाटा ह्यांच्या स्वप्ना मुळेच शक्य झाले. विविध स्पोर्ट्स कार बाळ्गण्या व्यतिरिक्त रतन टाटा यांना विमान उड्डाण करणे आणि पियानो वाजविणे देखील आवडते.

सेवानिवृत्ती नंतर टाटा म्हणाले होते की मला आता आयुष्यभर माझे छंद पूर्ण करायचे आहेत. आता मी पियानो वाजवीन आणि उडण्याचा माझा छंद पूर्ण करीन. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मभूषण (2000) आणि पद्मविभूषण (२००)) देऊन गौरविले. हे पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत.

Leave a Reply