देवळात घंटा असण्याचे कारणे..!

0
606
घंटा temple-bell-reason-sound-vibes-truth-myth tarathitrends

देवपुजा करताना घंटीचे महत्व जाणुन घ्या! जाणून घ्या तुमच्या देवघरामध्ये घंटी ठेवावी की नाही…!

भारतीय परंपरा मध्ये अनेक गोष्टींना महत्त्व दिले गेले आहे. मंदिरप्रवेशाच्या वेळी देवासमोर लावण्यात आलेला मोठा घंटा आपण नेहमीच पहात असतो पण मंदिरात घंटा का लावत असावा याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच! देवाच्या दर्शनाअगोदर देवळात घंटा वाजवूनच प्रवेश केला जातो तसेच आरती अोवाळताना घंटानाद केला जातो.  आपण आपल्या घरामध्ये देखील पुजा-अर्चना करताना एक छोटी घंटी वाजवत देवपूजा करत असतो.

देवपूजा करताना घंटीनादाचे महत्व काय आहे हे मात्र आपल्याला  माहित नसते. घंटानाद व देवपुजा यांबद्दल पौराणिक तथ्य व यामागचे शास्त्र आपल्याला माहीत नसते. मंदिरात किंवा देवालयात जाताना आपण मंदिराबाहेर असलेली घंटा वाजवल्याशिवाय पुढे जात नाही.

मंदिरप्रवेशाबाबत अनेक रीति-रिवाज आहेत. त्यामागे हिंदू धर्मशास्त्रानुसार शास्त्रीय कारण देखील सांगितले गेले आहे. तसेच आपण घरात रोजची देवपूजा करताना घरामध्ये घंटी वाजवत असतो, त्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे!

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे देवालयात घंटा असण्याचे व घरात देवघरामध्ये पूजा करताना घंटी वाजवण्याचे कारण व त्याचे महत्त्व सांगणार आहोत.

१.पुराणकथांनुसार असे म्हटले जाते की, या सृष्टीचे निर्माण झाले तेव्हा, जो ध्वनी निर्माण झाला होता तो घंटानादासारखा होता. सृष्टीच्या प्रारंभाचे प्रतीक म्हणून घंटेचा सन्मान केला जातो. यामुळे जेव्हा आपण रोज मंदिरामध्ये किंवा घरामध्ये घंटानाद करून आरती करतो तेव्हा आपण ईश्वराशी जोडले जातो अशी पवित्र भावना यामागे आहे.

२.देवालयातील घंटा अथवा आपल्या देवघरातील घंटी वाजवल्यामुळे जो नाद ध्वनी तयार होतो, त्यामुळे दुःख व टेन्शन यांपासून मुक्तता मिळते. घंटानादामुळे सकारात्मक उर्जा लहरी ध्वनीरुपाने आपल्या आजूबाजूला प्रवाहित होतात. पुराणशास्त्रांमध्ये “गरुण घंटी” ला महत्त्व दिले आहे.ही गरुन घंटी छोट्या आकाराची असते व ती प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये पूजेकरता वापरली जाते. गरुन घंटी पुजा करताना वाजवल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतात आणि घरामध्ये सलोख्याचे वातावरण व आनंद निर्माण होतो. घरातील लोकांमध्ये प्रेम, आपुलकी वाढते!

३.मंदिरांमध्ये वाजवली जाणारी घंटा काळाचे प्रतिक मानले जाते. कारण मंदिरामधील घंटा आकाराने खूप मोठी असते व या घंटेचा आवाज काही किलो मीटर पर्यंत जाऊ शकतो. मंदिरातील घंटेच्या नादामुळे मृत्यू देखील दूर पळू शकतो, अशी धारणा आहे. दररोज मंदिरातील घंटा वाजवल्यामुळे व्यक्तीची मानसिक धैर्य वाढते. व्यक्ती मानसिक रूपाने मजबूत होतो.

त्यामुळे शत्रू देखील व्यक्तीवर वरचढ बनत नाही. तर हे होती घंटानादाचे महत्व व देवळात व घरात घंटा असण्याचे शास्त्रीय कारण! ज्यामुळे हिंदू धर्मामध्ये घरातील देवपुजा करताना घंटी वाजवतात व मंदिरामध्ये मोठा घंटानाद केला जातो.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply