चिकन किंवा अंडे खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो का?

0
580
reason of bird flu chicken or egg harmfull what why how marathi trends

‘शेळी जाते जीव निशी आणि खाणारा म्हणतो वातड’, अशी काहीशी गत सध्या कोंबड्यांची झाली आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता कुठे सगळं सावरत न सावरतो तोच आता बर्ड फ्लूमुळे लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. बर्ड फ्ल्यु हा पक्ष्यांमध्ये होणाऱ्या विषाणूं मुळे उद्भवणारा रोग आहे. विषाणू पक्ष्यांच्या विष्ठेत असतो. ‘बर्ड फ्लू’ हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो.

१९९७ मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या ६० टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.

देशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरले अशा बातम्या समोर येत आहेत. पण यासंबंधी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा ही समोर आला आहे. चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही.

भारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम – ARDS होण्याची शक्यता असते. ताप – सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात.

बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं

• सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती द्यावी.
• पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
• संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
• बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
• जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
• पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.

कोरोनाच्या बाबतीत जशी आपण काळजी घेतो. त्याच पद्धतीने स्वच्छता आणि निर्जंतूकीकरण करणं महत्त्वाचं आहे. मांस किंवा अंडी खाताना स्वच्छ धुणे, उकळून खाणं महत्त्वाचं आहे.मांस हे नेहमी आपण उकळून भाजून गरम करून आणि त्यावर प्रक्रिया करून खावे, त्यामुळे अशा तापमानात अन्न किंवा मांस शिजवल्याने कोणताही धोका राहत नाही. म्हणजे काय तर काळजी घेतल्याने रोगाचा धोका कमी होतो.

खरंतर, कोणताही आहार घेताना तो स्वच्छ धुतला गेला पाहिजे. त्याला उकळून खाल्ल पाहिजे. त्यामुळे तुम्हीही जर चिकन आणि अंडी खात असाल ती पूर्ण उकळून खाल्ली पाहिजेत.

Leave a Reply