शिंदे-फडणवीसांना रितेश देशमुखच्या हटके शुभेच्छा, फडणवीसांना दिल्या या शुभेच्छा

0
387
Riteish Deshmukh's best wishes to Shinde-Fadnavis, best wishes to Fadnavis

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काल अनपेक्षित पणे मुख्यमंत्री पदाची, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या दहा दिवस सुरु असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. तत्पूर्वी गुरुवारी एकनाथ शिंदे हे दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाने शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.

शुभेच्छांचा वर्षाव
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यामध्ये अभिनेता रितेश देशमुख यानेही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रितेश देशमुख याने देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या शुभेच्छा सोशल मिडीयावर चर्चेत आहेत.

अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर रितेश देशमुखने ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रितेशने दोन ट्विट केले आहे. त्यातील एका ट्विटमध्ये रितेशने एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर केला आहे. “श्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा”, असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
तर त्यापाठोपाठ केलेल्या ट्विट मध्ये रितेश देशमुख याने देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज आपण शपथ घेतली. आपले खूप खूप अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा”, असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे.

Riteish deshmukh

Leave a Reply