रशियाकडून युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या घराजवळ रॉकेट हल्ला…

0
348
Rocket fire from the house of the President of Ukraine ...

रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले सुरूच आहेत. युद्धामुळे रशियन सैन्याने युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त केले आहे. रशियाकडून युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या हत्येचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप युक्रेनने केला आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या निवास स्थानाजवळ रॉकेटचा काही भाग आढळून आला आहे. राष्ट्रपती निवास स्थानावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. रशियाने आपल्या एका वृत्तात आपण केलेल्या हल्ल्यात राष्ट्रपती भवनाचे नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

President of Ukraine zelensky house

जगातील काही वृत्तांनुसार, रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने किमान तीन वेळेस झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे.झेलेन्स्की यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडलेल्या या रॉकेटवर भाष्य केले आहे. रशियाचा निशाणा चुकला असल्याचे सांगत त्यांनी याआधीदेखील आपल्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, रशियाच्या वृत्तानुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे देश सोडून गेले आहे. रशियन सरकारचे वृत्तमाध्यम ‘स्पुतनिक’ने हा दावा केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पोलंडमध्ये आश्रय घेतल्याचे या वृत्तात म्हटले. मात्र, हा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे.

Leave a Reply